पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना ओसामा बिन लादेनकडून आर्थिक मदत मिळत असल्याचा खळबळजनक आरोप पाकिस्तानचे माजी राजदूत अबिदा हुसेन यांनी केला आहे. “होय ओसामा बिन लादेन हा एकेकाळी नवाझ शरीफ यांना साहाय्य करत होता. पण ती खूप क्लीष्ट गोष्ट आहे. तो (ओसामा बिन लादेन) हा नवाझ शरीफ यांना आर्थिक सहाय्यदेखील करत असे.” असेही अबिदा हुसेन यांनी सांगितले.
आबिदा या नवाझ शरीफ मंत्रिमंडळातील एक सदस्य देखील होत्या. “ओसामा बिन लादेन हा पूर्वी सर्वांचा लाडका होता. अमेरिकेलाही अफगाणिस्तानमध्ये लादेनचा खूप उपयोग झाला. पण अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएत युनियनला हरवल्यानंतर अमेरिकेने लादेनला बाजूला सारले.” असेही त्यांनी सांगितले.
आबिदा हुसेन यांची ही टिप्पणी पाकिस्ताच्या संसदेत, पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफच्या फार्रुख हबीब यांनी, नवाझ शरीफ यांनी ओसामा बिन लादेनकडून $१ कोटी घेऊन बेनझीर भुट्टो यांच्याविरुद्ध अविश्वास मत प्रस्ताव आणल्याचा आरोप केला होता.
ओसामा बिन लादेन जिवंत असताना दोन वेळा नवाझ शरीफ पंतप्रधान होते. १९९०-९३ आणि १९९७-९८ या काळात नवाझ शरीफ पंतप्रधान होते. याच काळात भारतात काश्मीरमध्ये दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी लादेनकडून पैसे घेतल्याचा आरोप नवाझ शरीफ यांच्यावर करण्यात आला आहे.