गाझामधील रुग्णालयानंतर आता चर्चवर हल्ला; अनेकजण ठार

ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्च परिसरात हा हल्ला झाला

गाझामधील रुग्णालयानंतर आता चर्चवर हल्ला; अनेकजण ठार

गाझा पट्टीमधील रुग्णालयावर झालेल्या स्फोटात शेकडो जण ठार झाले होते. हा हल्ला कोणी केला यावरून इस्रायल आणि हमास यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू होते. आता गाझा पट्टीमधील एका चर्चवर हल्ला झाला असून त्यातही अनेकजण ठार झाले आहेत. हा हल्लाही इस्रायलनेच केल्याचा दावा हमासने केला आहे.

 

 

गाझा पट्टीतील एका रुग्णालयावर रॉकेट हल्ला झाल्याचे समोर आले होते. त्यात जवळपास ५०० लोक मृत्युमुखी पडले होते. पण हा हल्ला इस्रायलने केल्याचा आरोप होत असताना काही व्हीडिओ आणि माहिती समोर आली त्यात हमासचेच एक रॉकेट या रुग्णालयाच्या परिसरात पडून आग लागली आणि त्यात अनेक रुग्ण व इतर दगावल्याचे स्पष्ट झाले.

 

हे ही वाचा:

ललित पाटील भावासोबत ड्रग्स फॅक्टरीतून मिळवत होता बक्कळ नफा

कपडा व्यापाराची सव्वा दोन कोटींची फसवणूक

कंत्राटी भरतीचा जीआर रद्द; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

पाकिस्तान-अफगाण सीमेवरील हिंदू पठाण सांभाळतात दसऱ्याचा वारसा

गाझा पट्टीमधील एका चर्चमध्ये आश्रय घेतलेले अनेक जण गुरुवारी रात्री झालेल्या या हल्ल्यात ठार झाल्याचे हमासच्या अंतर्गत मंत्रालयातर्फे सांगण्यात आले आहे. ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्च परिसरात झालेल्या या हल्ल्यात मोठ्या संख्येने नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच, अनेकजण जखमी झाले आहेत. गाझा पट्टीमधील पॅलिस्टिनींच्या या परिसरात युद्धाला तोंड फुटल्यानंतर गाझामधील अनेक निर्वासितांनी या चर्चमध्ये आश्रय घेतला होता. हा हल्ला चर्चच्या जवळून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. तर, या हल्ल्याची आपण चौकशी करत आहोत, असे स्पष्टीकरण इस्रायलकडून देण्यात आले आहे.

 

इस्रायल आणि हमासमधील या युद्धाने शुक्रवारी १४व्या दिवसात प्रवेश केला. दोन्ही बाजूंनी झालेल्या या हल्ल्यांत आतापर्यंत पाच हजार जणांना जीव गमवावा लागला आहे. मंगळवारी रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यातही शेकडो जण ठार झाल्याचे सांगितले जात आहे. या दरम्यान गुरुवारी वेस्ट बँकमध्ये इस्रायली सुरक्षा सैनिक आणि पॅलिस्टिनींच्या दरम्यान चकमक उडाली. तर, गाझा पट्टीत इस्रायलच्या काही नागरिकांना हमासने ताब्यात घेतल्याचेही आढळून आले आहे. हमासने ताब्यात घेतलेल्या या सुमारे १०० इस्रायली नागरिकांना कैद करून त्यांची रस्त्यांवरून धिंड काढली जात आहे, असा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

Exit mobile version