दिल्ल्लीतील AIIMS रुग्णालयातून एक घटना समोर आली आहे. या रुग्णालयात अनेकजण अवयव दान करतात. मात्र एका अवघ्या पाच वर्षाच्या मुलीने अवयवदान करून दोन लोकांना नवीन जीवनदान दिले आहे. डोक्याला गोळी लागल्याने तिने जगाचा निरोप घेतला पण जाता जाता स्वतःचे अवयव दान करून इतिहास घडवला.
रॉली असं या चिमुरडीचे नाव असून तिचे वय ५ वर्षे १० महिने होते. १७ एप्रिल रोजी, रॉली नोएडा सेक्टर १२१ मधील त्याच्या घराबाहेर खेळत होती आणि तिचे आई वडील घरात होते. मात्र अचानक मोठा आवाज आला आणि रॉलीचा रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यानंतर लगेच तिचे वडील धावत बाहेर गेले असता रॉली रक्ताच्या थारोळ्यात पडला होती. त्यांनतर तिला तात्काळ नोएडातील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनतर तिला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केले. एम्समध्ये रॉलीच्या डोक्याचे सिटीस्कॅन करण्यात आले असता तिच्या डोक्याला गोळी लागल्याने डोक्याची दोन हाडे मोडली होती.
एम्स रुग्णालयात दोन दिवस रॉलीवर उपचार सुरु होते. मात्र, शुक्रवारी रॉलीला ब्रेनडेड म्हणून घोषित करण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी रॉलीच्या पालकांना अवयवदानची माहिती दिली. सुरवातीला त्यांना हे पटले नाही मात्र नंतर ते तयार झाल्याचे एम्स रुग्णलयाच्या डॉक्टरांनी सांगितले.
हे ही वाचा:
परीक्षेत पास होण्यासाठी मुलींनी कॉपीचा हा मार्ग निवडला!
टाटा मोटर्स लवकरच बनवणार इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी
जॅकलिन फर्नांडिसच्या संपत्तीवर ईडीची टाच
कुटुंबाच्या संमतीनंतर अपोलोमध्ये दाखल असलेल्या मुलाच्या शरीरात रॉलीचे यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. तसेच रॉलीच्या दोन्ही मूत्रपिंड एम्सच्या एकाच रुग्णावर प्रत्यारोपण करण्यात आले.