तब्बल २०० जण करणार आहेत अवयवदान

तब्बल २०० जण करणार आहेत अवयवदान

पुरंदर तालुक्यातील एका गावाने अवयव दानासाठी पुढाकार घेतला आहे. अवयवदानाची प्रक्रिया सोपी व्हावी म्हणून विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीतर्फे अवयवदानाचा अर्ज भरण्यासाठी क्युआर कोड उपलब्ध करून दिला आहे.

पुरंदर तालुक्यातील धालेवाडी गावाने अवयव दानासाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे. या गावातील ३०० कुटुंबांनी मरणोत्तर अवयवदानाची इच्छा दर्शवली असून त्यापैकी २०० कुटुंबांनी अवयवदानासाठीचा अर्जही भरला आहे.

अनेकांना अवयव दान करण्याची इच्छा असते पण त्यासाठीच्या किचकट प्रक्रियेपासून वाचण्यासाठी लोक पुढाकार घेत नाहीत. ही प्रक्रिया सोपी व्हावी म्हणून विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीतर्फे क्युआर कोड उपलब्ध करून देण्यात आला. या समितीच्या मार्गदर्शनाखाली धालेवाडी गावातील युवा सारथी फाउंडेशनने ग्रामपंचायतीच्या मदतीने गावातील प्रत्येकाचा मरणोत्तर अवयवदानाचा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

अवयवदानाबाबत समाजात जनजागृती होण्याची गरज आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक व्यक्तींनी या चळवळीला बळ देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. युवा सारथी फाउंडेशनने पाठपुरावा करत हा उपक्रम यशस्वी केला आहे. गावकऱ्यांचा हा प्रतिसाद आम्हाला उत्साह देणारा आहे असे विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या समन्वयक आरती गोखले म्हणाल्या.

हे ही वाचा:

मोदी सरकारची विद्युत वाहनांच्या दिशेने वेगाने वाटचाल

अमेरिकेच्या माघारीबद्दल त्या शहीद सैनिकाच्या वडिलांना दुःख

तालिबानकडे अमेरिकन शस्त्रास्त्र

चिमुकल्या वरदचा खून की नरबळी?

अवयवदानासाठी ग्रामस्थांना अर्ज भरण्यासाठी तयार करणे म्हणजे एक आव्हानच होते. घरातील सुशिक्षित व्यक्तींच्या मदतीने ही आव्हान पेलले. साहिल चव्हाण, आदित्य भांड, चारु काळाणे, रोहित भालेराव आणि चेतन शेलार यांच्या मदतीने हा उपक्रम यशस्वी झाला, असे युवा सारथी फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल खोपडे देशमुख यांनी सांगितले.

Exit mobile version