सीबीआयने बिहारमधील छपरा आणि भागलपूर या दोन शहरांसह २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ५९ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. चाइल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित संपूर्ण नेटवर्कवर हल्ला करण्यासाठी केंद्रीय एजन्सीने शनिवारी ऑपरेशन ‘मेघचक्र’ सुरू केले. सकाळपासून सुरू झालेली छाप्यांची ही मालिका सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. यावेळी सर्व ठिकाणांहून ५० पेक्षा अधिक संशयितांकडून मोठ्या प्रमाणात मोबाईल, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली. त्यांच्यावर CSAM (चाइल्ड सेक्शुअल व्ह्यूज मटेरियल) किंवा पोर्नोग्राफीशी संबंधित सामग्री गोळा करणे, एकमेकांना पाठवणे किंवा शेअर करणे आणि डाउनलोड करणे असा आरोप आहे. अशा साहित्याबाबत इंटरपोलकडून बरीच माहिती मिळाली असून यांच्या तारा इतर अनेक देशांशी जोडलेल्या आढळल्या आहेत. यात अनेक प्रकारे लैंगिक-आधारित गुन्ह्यांच्या प्रकरणांचाही समावेश आहे.
सीबीआयने लहान मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांशी संबंधित दोन गुन्हे दाखल केल्यानंतर देशभरात ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. सिंगापूर आणि न्यूझीलंडमधून आयटी कायद्यांतर्गत अनेक संवेदनशील माहितीही एजन्सीला मिळाली होती. यामध्ये असे सांगण्यात आले होते की मोठ्या संख्येने भारतीय लोक बाल पोर्नोग्राफिक सामग्री डाउनलोड करणे, प्रचार करणे आणि प्रसारित करण्यात दोषी आढळले आहे. या माहितीच्या आधारे, सीबीआयने अशा सामग्रीशी संबंधित सर्व संवेदनशील ठिकाणे ओळखून व्यापक कारवाई केली. तसेच सीबीआयने गेल्या वर्षीही अशीच कारवाई केली होती, ज्याला ‘ऑपरेशन कार्बन’ असे नाव देण्यात आले होते.
हे ही वाचा:
बारावीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना करता येणार नोकरी
अमेरिका का म्हणतोय UNSC मध्ये भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व द्या?
… आणि पंतप्रधान मोदींनी परभणीच्या चिमुरडीला पाठवलं पत्र
‘ज्यांना दूध पाजले म्हणता त्या शिवसैनिकांचा त्याग, मेहनत आहे पक्षवाढीत’
ज्या राज्यांमध्ये छापे टाकण्यात आले त्यात हरियाणा, उत्तराखंड, गुजरात, यूपी, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र (मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर आणि नागपूर), झारखंड (रांची), आंध्र प्रदेश या दोन शहरांचा समावेश आहे. बिहार राज्य, कर्नाटक, छत्तीसगढ, दिल्ली, केरळ, पंजाब, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, गोवा आणि आसाम येथून जप्त केलेल्या सर्व साहित्याची सखोल चौकशी आणि फॉरेन्सिक तपासणी सुरू करण्यात आली आहे.