ऑपरेशन ब्रह्मा: भारतीय नौदलाची जहाजे ४० टन मदत साहित्य घेऊन म्यानमारकडे रवाना

८० सदस्यीय एनडीआरएफ शोध आणि बचाव पथकही भारताने पाठवले

ऑपरेशन ब्रह्मा: भारतीय नौदलाची जहाजे ४० टन मदत साहित्य घेऊन म्यानमारकडे रवाना

शक्तिशाली भूकंपाने प्रभावित झालेल्या म्यानमारसाठी भारताने मदतीचा हात देऊ केला आहे. दुर्घटनेनंतर भारताने तातडीने म्यानमारला मदतीचे आश्वासन दिले असून म्यानमारमधील लोकांच्या पाठीशी भारत एकजुटीने उभा राहील असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहे. तसेच म्यानमारला मदत पाठवण्यासाठी म्हणून ‘ऑपरेशन ब्रह्मा’ सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत १५ टन मदत पहिल्या टप्प्यात पाठवण्यात आली असून आता आणखी मदत घेऊन भारतीय नौदलाची दोन जहाजेही म्यानमारला रवाना झाली आहेत.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी माहिती दिली की, ४० टन मदत साहित्य घेऊन दोन जहाजे शेजारील देशासाठी रवाना झाली आहेत. एस. जयशंकर यांनी ट्वीट करत लिहिले आहे की, “ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत आयएनएस सातपुडा आणि आयएनएस सावित्री ही दोन भारतीय नौदलाची जहाजे ४० टन मदत साहित्य घेऊन यांगून बंदराकडे रवाना झाली आहेत.” याशिवाय त्यांनी आणखी एक ट्विटमध्ये म्हटले आहे की, ८० सदस्यीय एनडीआरएफ शोध आणि बचाव पथकही नेप्यी तावसाठी रवाना झाले आहे. हे पथक म्यानमारमधील बचाव कार्यात मदत करणार आहे.

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी म्यानमारचे लष्कराच्या नेतृत्वाखालील सरकारचे प्रमुख मिन आंग ह्लाईंग यांच्याशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की भारत या कठीण प्रसंगी म्यानमारच्या नागरिकांसोबत ठामपणे उभा आहे. त्यांनी शोक व्यक्त करत या कठीण काळात म्यानमारच्या नागरिकांसोबत ठाम उभे असल्याचे आश्वासन दिले. ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत आपत्ती निवारण साहित्य, मानवीय मदत, शोध व बचाव पथक प्रभावित भागात वेगाने पाठवले जात आहे, अशीही माहिती दिली.

हे ही वाचा..

संभलमध्ये खुलेआम मटण विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार

हिंदू नववर्षाच्या भव्य स्वागतासाठी हिंदवी एकता मंचच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन

चीनची आव्हान : फिलिपिन्स, जपान आणि अमेरिका यांचा संयुक्त सैन्य सराव

आशीष सूद यांचा अरविंद केजरीवालांवर पलटवार

‘ऑपरेशन ब्रह्मा’ मोहिमेअंतर्गत म्यानमारला १५ टन मदत साहित्य आधीच पोहोचवण्यात आले आहे. हिंडन एअर फोर्स स्टेशनवरून आयएएफ सी- 130 या विमानाने ही मदत सामग्री म्यानमारला पाठवण्यात आली. मदत साहित्यात तंबू, स्लीपिंग बॅग्ज, ब्लँकेट, रेडी-टू-ईट जेवण, वॉटर प्युरिफायर, हायजीन किट, सोलर लॅम्प, जनरेटर सेट अशा वस्तूंचा समावेश आहे. याशिवाय पॅरासिटामॉल, अँटीबायोटिक्स, कॅन्युला, सिरिंज, हातमोजे, कापसाच्या पट्ट्या आणि लघवीच्या पिशव्या यासारख्या वैद्यकीय गोष्टींचाही समावेश आहे.

सतीश सालियन यांना बकरा बनवण्याची तयारी होती...| Dinesh Kanji | Disha Salian | Satish Salian

Exit mobile version