ओपेककडून जगाला तेल दिलासा

ओपेककडून जगाला तेल दिलासा

मे महिन्यापासून तेल उत्पादन वाढवणार

तेल उत्पादनातील अग्रणी संघटना ओपेक आणि ओपेक प्लस अशा दोन्ही तेल उत्पादक गटांनी आपापले तेल उत्पादन मे महिन्यापासून वाढवत नेण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी ओपेक या संघटनेचे नेतृत्व सौदी अरेबिया करते तर ओपेक प्लस देशांमध्ये रशिया आणि इतर तेल उत्पादक देशांचा समावेश होतो

कोविड-१९ महामारीच्या काळात या देशांनी तेल उत्पादन घटवण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून आत्तापर्यंत अतिशय कमी प्रमाणात तेलाचे उत्पादन होत होते. सौदी अरेबियाशी अमेरिकेने संवाद साधून त्यांच्यावर उत्पादन वाढवून तेलाचे भाव परवडण्याजोगे ठेवण्याबाबत सातत्याने दबाव बनवला होता.

हे ही वाचा:

सचिन वाझेशी संबंधित आणखीन एक गाडी एनआयएच्या ताब्यात

मुंबईत लॉकडाऊन लावावाच लागेल-अस्लम शेख

इतका कन्फ्यूज मुख्यमंत्री महाराष्ट्राने पहिला नाही, मनसेचे सडेतोड

ओपेक प्लस देशांनी त्यांचे उत्पादन मे महिन्यात साडे तीन लाख बॅरल्स प्रतिदिन नंतर जूनमध्ये अजून साडे तीन लाख बॅरल्स प्रतिदिनने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर जुलै महिन्यापासून हे उत्पादन प्रत्येक महिन्याला चार लाख बॅरल्स प्रतिदिन एवढे वाढवण्यात येणार आहे.

सौदी अरेबिया सुद्धा स्वतःचे तेल उत्पादन हळूहळू वाढवत नेणार आहे. सध्या १० लाख बॅरल प्रतिदिन उत्पादन करत आहे. त्यात मे महिन्यापासून अडीच लाख बॅरल्स प्रतिदिन एवढी भर पडणार आहे. त्याच्यापुढे जुनमध्ये साडेतीन लाख बॅरल्स प्रतिदिन तर जुलैमध्ये चार लाख बॅरल प्रतिदिन एवढी वाढ केली जाणार आहे.

सौदी अरेबियाचे तेल मंत्री राजपुत्र अब्दुलअझीज बिन सलमान यांच्यामते हा निर्णय कोणत्याही प्रकारे अमेरिकेशी चर्चा करून घेण्यात आलेला नाही.

Exit mobile version