भारताची तिसरी चांद्र मोहीम अर्थात चांद्रयान ३ आणखी एका महत्त्वाच्या टप्प्यात पोहोचते आहे. चांद्रयान ३ ला चंद्राच्या कक्षेत पोहोचण्यास केवळ सहा दिवस बाकी आहेत.
१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ ते एक वाजेपर्यंत चंद्राच्या दिशेने यानातून ते झेपावेल. सद्यस्थितीत चांद्रयान ३ पृथ्वीच्या कक्षेत फिरत आहे. त्याचा वेग हा प्रति सेकंद एक किमी ते १०.३ किमी प्रति सेकंद आहे. पृथ्वीपासून जवळ असताना (पेरिजी) यानाचा वेग सर्वांत जास्त, तर पृथ्वीपासून सर्वांत लांब असताना (अपोजी) वेग सर्वांत कमी असतो. यान चंद्राच्या कक्षेत झेपावण्यासाठी वेग सर्वाधिक असणे आवश्यक आहे. त्यामुळे या वेगादरम्यानच चांद्रयान चंद्राच्या कक्षेत झेपावेल. तसेच, चंद्राच्या दिशेने प्रवास करण्यासाठी यानाची दिशा बदलावी लागेल.
हे ही वाचा:
हिंदू-मुस्लिम सौहार्द हवे तर जबरदस्तीने धर्मांतरण, लव्ह जिहाद थांबले पाहिजे!
आरपीएफ जवानाने जयपूर मुंबई एक्स्प्रेसमध्ये अधिकाऱ्यासह चार जणांना घातली गोळी
शूर सैनिकांसाठी ‘मेरी माटी मेरा देश’ मोहीम !
दगडूशेठ गणपती दर्शन, लोकमान्य टिळक पुरस्कार, मेट्रो उद्घाटन… मंगळवारी पंतप्रधान पुण्यात
यानाला १.२ लाख किमीचा प्रवास करण्यासाठी सरासरी ५१ तास लागतील. पृथ्वी आणि चंद्रादरम्यानचे सरासरी अंतर ३.८ लाख किमी आहे. त्या दिवशीचे दोघांमधील अंतर हे पृथ्वी आणि चंद्राचे नेमके स्थान कसे आहे, त्यावर अवलंबून आहे. हे अंतर ३.६ लाख किमी ते ४ किमी लाख किमी दरम्यान काहीही असू शकते. चंद्राच्या कक्षेत पोहोचणे हा चांद्रमोहिमेचा केवळ एक टप्पा आहे.
इस्रोने चांद्रयान १ मोहिमेत सन २००८मध्ये आणि सन २०१९मध्ये चांद्रयान २ मोहिमेद्वारे केव्हाच चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. आता चंद्रावर यान पोहोचल्यावर चांद्रयान ३ मोहिमेचा महत्त्वाचा टप्पा सुरू होईल. प्रोपल्जन मॉड्युलच्या सहाय्याने चंद्राजवळ पोचल्यावर यान चंद्राभोवती दीर्घवर्तुळाकार कक्षेत सोडण्यात येईल. दीर्घवर्तुळाकार कक्षा टप्प्याटप्प्याने कमी करून अंतिमत: चांद्रयान ३ ला चंद्राभोवती १०० किमीच्या वर्तुळाकार कक्षेत प्रस्थापित करण्यात येईल. १७ ऑगस्टला प्रोपल्जन मॉड्युलपासून लँडर विलग होईल आणि ते २३ ऑगस्टला चंद्रावर निश्चित केलेल्या ठिकाणाकडे टप्प्याटप्प्याने उतरण्याची प्रक्रिया पार पडेल.