पाकिस्तान मधील हिंदू अल्पसंख्यांकांवर होणारे हल्ले आणि हिंदू मंदिरांची होणारी तोडफोड ही कायमच चिंतेचा विषय राहिला आहे. अशीच एक ताजी घटना पाकिस्तानातून समोर आली आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात ही घटना घडली आहे जिथे मुस्लिम कट्टरपंथीयांनी आणि हिंदू मंदिराची तोडफोड केली आहे. सिंध प्रांतातील थार पार्कर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या जिल्ह्यातील खत्री मोहल्ला येथील हिंगलाज माता मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे.
पाकिस्तान मधील कट्टरपंथीयांना कायद्याचा कोणताही धाक उरलेला नसून हिंगलाज माता मंदिरामध्ये झालेली तोडफोड याचे धडधडीत उदाहरण आहे. या संदर्भात प्रतिक्रिया देताना हिंदू मंदिर प्रबंधनचे अध्यक्ष कृषण शर्मा यांनी तीव्र शब्दात या घटनेचा निषेध नोंदवला असून पाकिस्तानमधील कट्टरपंथी हे इम्रान खान यांच्या सरकारला आणि पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाला घाबरत नसल्याचे नमूद केले आहे. तर पाकिस्तानमधील हिंदू नागरिकांनी मंदिरांची होणारी तोडफोड आणि मंदिरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या विरोधात मोर्चा काढला आणि या सर्व प्रकरणांमधील दोषींना लवकरात लवकर अटक होऊन शिक्षा करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
हे ही वाचा:
माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी भारताविरोधात ओकली गरळ
माहीमच्या बांधकाम व्यावसायिकाला गँगस्टर गुरू साटमच्या नावे फोन
महाराष्ट्रात आता सुपर मार्केटमध्ये मिळणार वाईन
काल्का शिमला रेल्वे मार्गावर बर्फाचे पांघरूण
पाकिस्तान मधील इस्लामी कट्टरपंथी हे कायमच हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर घाला घालण्याचा प्रयत्न करत असतात. इम्रान खान यांचे सरकार अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेच्याबाबत निरनिराळे दावे करताना दिसत असले, तरीही या दाव्यांमध्ये कोणतेच तथ्य नाही. या आधीही पाकिस्तान मधील हिंदू मंदिरांवर हल्ला झाल्याच्या आणि हिंदू मंदिरांची तोडफोड झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दुर्दैवाने या प्रकरणांमध्ये कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.