लसीकरणात भारताने गाठला ‘हा’ नवा टप्पा

लसीकरणात भारताने गाठला ‘हा’ नवा टप्पा

भारतात सुरू असलेल्या लसीकरणाच्या मोहिमेने मंगळवारी (२८ सप्टेंबर) अजून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवळजवळ लसीकरणासाठी पात्र असलेल्या प्रत्येक चार भारतीयांमधील एका व्यक्तीचे (२४.८ टक्के) पूर्ण लसीकरण झालेले आहे. ४३.५ टक्के भारतीयांना लसीचा एक डोस मिळालेला आहे.

भारताने हा टप्पा अशा वेळी गाठला आहे, जेव्हा देशातील कोरोनाची सक्रिय प्रकरणे सहा महिन्यांहून अधिक काळानंतर तीन लाखांच्या खाली आली आहेत. मंगळवारच्या संध्याकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भारतातील ६४.२५ कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे ८७.६२ कोटी डोस देण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यासाठी लगबग सुरू!

जायकवाडी धरण दीर्घ कालावधीनंतर तृप्त; मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राची तहान भागणार!

ज्येष्ठ कामगार नेते विजय कांबळेंचे निधन

कोण आहेत फुमियो किशिदा?

आता भारत हा चीननंतर दुसरा देश आहे, जिथे जास्तीत जास्त लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा किमान एक डोस मिळाला आहे. यापैकी २३ कोटी ३६ लाख लोकांना कोरोना प्रतिबंध लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. उर्वरित ४४ कोटी ८९ लाख लोकांना लसीचा किमान एक डोस मिळाला आहे. याचा अर्थ असा की, देशाच्या १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या २४.८ टक्के लोकसंख्येला लसीचा डोस मिळाला आहे. बुधवारी हा आकडा २५ टक्क्यांच्या पुढे जाईल.

भारतामधील सात प्रमुख राज्ये अजूनही लसीकरणात राष्ट्रीय सरासरीपेक्षा मागे आहेत. उत्तर प्रदेशात, दोन्ही डोसची सरासरी सर्वात कमी १३.६ टक्के आहे, बिहारमध्ये १४.५ टक्के प्रौढांना लसीकरण करण्यात आले आहे आणि झारखंडमध्ये १६.२ टक्के प्रौढांना दोन्ही डोस मिळाले आहेत. भारताने आतापर्यंत सप्टेंबर महिन्यात लसीकरणाच्या बाबतीत २२.५ करोड डोस दिले आहेत.

Exit mobile version