किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठाने लसीकरणानंतरही कोरोना संसर्ग झालेल्या डॉक्टरांचे सर्वेक्षण केले आहे. लसीचा एक डोस हा कोरोनानंतर होणाऱ्या आजारांपासून संरक्षण करू शकतो, असे विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार समोर आले आहे. ५६ निवासी डॉक्टरांना पाच ते सहा महिन्याच्या अंतराने दोनदा कोरोनाचा संसर्ग झाला होता त्यावरून हे सर्वेक्षण करण्यात आले.
५६ पैकी २१ डॉक्टरांनी लसीचा एक डोस घेतला होता. त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षण दिसली नाहीत किंवा एक ते दोनच अगदीच सौम्य लक्षण दिसून आली. ही सौम्य लक्षणेही तीन ते चार दिवसांनी कमी झाली. या २१ लोकांपैकी १६ लोकांनी लसीचा एक डोस घेतला होता, तर पाच जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. लसीचा एक डोस घेणाऱ्या सोळा लोकांपैकी तीन लोकांना डोस घेतल्यावर दोन ते तीन आठवड्यातच संसर्ग झाला तर उरलेल्या १३ जणांना तीन आठवड्यानंतर संसर्ग झाला. लसीचे दोन डोस घेतलेल्या पाच जणांनासुद्धा तीन आठवड्यानंतर संसर्ग झाला होता.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानातून भारतीयांची सुटका करण्यास सुरूवात
अफगाणिस्तान प्रश्नावर काय म्हणाले जो बायडन? वाचा सविस्तर
रॉजर फेडररचा टेनिसमधून संन्यास? काय झाले आहे वाचा…
मुंबईत बसची चणचण, तर गुजरातमध्ये इलेक्ट्रिक बस
लस घेतल्यानंतर दोन ते तीन आठवड्यांनी शरीरात प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) तयार होतात. या अभ्यासातून असे दिसून आले की अँटीबॉडीजमुळे लोकांना गंभीर लक्षण दिसून आले नाही. यासाठी अजून अभ्यास आणि संशोधन होण्याची आवश्यकता आहे. पहिल्यांदा संसर्ग झाल्यानंतर शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीज व्यक्तीला दुसऱ्यांदा संसर्ग झाल्यावरही त्यांच काम करत असण्याची शक्यता आहे, असे विद्यापीठाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. डी. हिमांशू यांनी सांगितले.
या अभ्यासाकरिता विचारात घेतेलेल्या डॉक्टरांना वगळून इतरही काही डॉक्टरांनी त्यांचे अनुभव टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले आणि निष्कर्षांचे समर्थन केले. विद्यापीठाचे कुलगुरू लेफ्ट. जनरल बिपीन पुरी यांना लस घेतल्यानंतरही नव्या प्रकारच्या कोरोनाचा संसर्ग झाला होता.