कराची स्फोटाने पुन्हा हादरले; एका महिलेचा मृत्यू

कराची स्फोटाने पुन्हा हादरले; एका महिलेचा मृत्यू

पाकिस्तानमधील कराचीतील खरादर भागात सोमवार, १६ मे रोजी संध्याकाळी बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त आहे. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून १० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. सध्या पोलिसांकडून या बॉम्बस्फोटामागचं कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

खरदार परिसरात बोल्टन मार्केट या गर्दीच्या ठिकाणी काल संध्याकाळी हा बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात एक दुचाकी, एक रिक्षा आणि एका पोलिसांच्या वाहनाचं नुकसान झालं आहे. स्फोटात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

हे ही वाचा:

आसाममध्ये पावसाचा हाहाकार; २ लाख लोकांना पुराचा फटका

बॅडमिंटनमध्येही ‘अच्छे दिन’

…. असे आहे पंतप्रधान मोदींचे भगवान बुद्धांशी नाते

‘खोटी नियत, कद्रु दानत हीच या खंडणीखोर सरकारची ओळख’

हल्लीच्या हल्ली कराचीमध्ये झालेला हा तिसरा स्फोट आहे. यापूर्वीही कराचीमधील बाजारपेठेत भीषण स्फोट झाला होता. त्यात तीन जणांचा मृत्यू झाला होता तर तेराहून अधिक नागरिक जखमी झाले होते. त्यापूर्वी एप्रिलमध्ये कराची विद्यापीठात स्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटात तीन चिनी नागरिकांसह पाच जणांचा मृत्यू झाला होता तर काही जण जखमी झाले होते.

Exit mobile version