अमेरिकेत अंदाधुंद गोळीबाराची आणखी एक घटना; एक ठार

अंथरुणातून उठतानाही त्रास होत असलेल्या व्यक्तीने उपचारासाठी आलेले असताना केले कृत्य

अमेरिकेत अंदाधुंद गोळीबाराची आणखी एक घटना; एक ठार

अमेरिकेच्या अटलांटा येथील वैद्यकीय इमारतीत झालेल्या गोळीबारात एक ठार तर तिघे जखमी झाले. बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या मारेकऱ्याला अटक करण्यात आली आहे.

डिऑन पॅटरसन (२४) असे या बंदुकधाऱ्याचे नाव असून त्याने गोळीबार केल्यानंतर गाडीची चोरी करून पलायन केले होते. गोळीबाराच्या घटनेनंतर आठ तासांनी त्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. ‘हे बंदुकीच्या हिंसाचाराचे एक भयानक कृत्य होते आणि ही देशातील एकमेव घटना नाही, याचीही आम्हाला जाणीव आहे,’ अशी प्रतिक्रिया अटलांटाचे महापौर आंद्रे डिकन्स यांनी दिली.

अटलांटाच्या पोलिस प्रमुखांनी या घटनेची विस्तृत माहिती दिली. ‘मिडटाउन अटलांटा येथील वैद्यकीय इमारतीत दुपारनंतर बंदुकधारी व्यक्तीने प्रवेश केला. तेथील ११व्या मजल्यावरील वेटिंग रूममध्ये त्याने गोळ्या झाडल्या. अधिकाऱ्यांनीही त्याला प्रत्युत्तर दिले. त्याने केलेल्या गोळीबारात एका ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि इतर चार जण जखमी झाले. या चौघीही महिला होत्या’, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याने गोळीबार का केला असावा, याची तपशीलवार माहिती पोलिसांनी दिली नाही.

हे ही वाचा:

रशिया झेलेन्स्कीवर हल्ला करण्याच्या तयारीत?

सर्बियात १३ वर्षांच्या मुलाने शाळेत आठ मुलांना घातल्या गोळ्या

‘गो फर्स्ट’च्या वैमानिकांची एअर इंडिया, इंडिगोच्या ‘कॉकपिट’वर नजर

आता घरी बसून पार्किंगची जागा ठरवा

गोळीबार करणारा पॅटरसन त्याच्या आईसोबत वैद्यकीय कार्यालयाच्या इमारतीत होता. पॅटरसन याने जुलै २०१८मध्ये लष्करात प्रवेश केला होता, शेवटी त्याने इलेक्ट्रिशियन म्हणून काम केले. नंतर त्याला सेवेतून निरोप देण्यात आला होता. अलीकडेच पॅरसन याला खाताना आणि अंथरुणातून उठतानाही त्रास होत होता. त्यामुळेच तो वैद्यकीय इमारतीत आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. वाचलेल्या पीडितांपैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यापैकी एकावर बुधवारी दुपारपर्यंत शस्त्रक्रिया सुरू होती.

Exit mobile version