नासाने दिला इशारा
नासाच्या शास्त्रज्ञांनी पृथ्वीसाठी एक धोक्याचा इशारा दिला आहे. ज्यामुळे जगभर चिंतेचे वातावरण पसरले आहे. नासाने म्हटले आहे की, ११ फेब्रुवारी रोजी एक लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार असून जर हा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर मोठा विनाश होऊ शकतो.
आपल्या पृथ्वीला दररोज अवकाशातून पडणाऱ्या अनेक लघुग्रहांना सामोरे जावे लागते, यातील अनेक लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जातात, तर अनेक समुद्रात पडतात, परंतु जर एखादा महाकाय लघुग्रह समुद्राऐवजी जमिनीवर पडला तरमोठा विध्वंस होण्याची शक्यता आहे. अशा एका धोक्याची माहिती नासा संस्थेने दिली आहे. नासाने म्हटले आहे की, ११ फेब्रुवारी रोजी पृथ्वीच्या जवळून एक विशाल लघुग्रह जाणार आहे. हा लघुग्रह आणि पृथ्वी यांच्यात टक्कर झाल्यास पृथ्वीचा विनाश होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
परमबीर सिंह वसुली प्रकरणात सॉफ्टवेअरमध्ये ‘छोटा शकील’
अर्थसंकल्पाविषयीचा हा इतिहास माहित आहे का? येथे वाचा सविस्तर
‘दंगल ऑफ क्राईम’….कुस्तीपटू सुशील कुमारवर माहितीपट
लघुग्रहाचा आकार किती आहे?
पृथ्वीच्या दिशेने वेगाने सरकणाऱ्या या लघुग्रहाचा आकार एम्पायर स्टेट बिल्डिंगपेक्षाही मोठा असल्याचे नासाने म्हटले आहे. त्याला १३८९७१ (2001 CB21) असे नाव देण्यात आले आहे. या लघुग्रहाची रुंदी ४२६५ फूट असून नासाने पृथ्वीच्या सर्वात जवळून जाणार्या लघुग्रहांच्या यादीत याला स्थान दिले आहे. मात्र, पृथ्वीच्या सर्वात जवळून म्हणजे पृथ्वीपासून तीन लाख मैलांवरून जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी सुद्धा नासाने १८ जानेवारी २०२२ रोजी पृथ्वीच्या जवळून एक लघुग्रह जाणार असल्याची माहिती दिली होती. त्या लघुग्रहाला ७४८२ (1994 PC1) असे नाव देण्यात आले होते. या लघुग्रहाचा व्यास १.०५२ किलोमीटर आहे. आणि फिरण्याचा कालावधी सुमारे २.६ तास आहे.