‘या’ दिवशी अयोध्येतील राम मंदिर होणार भाविकांसाठी खुलं

‘या’ दिवशी अयोध्येतील राम मंदिर होणार भाविकांसाठी खुलं

अयोध्येत राम मंदिराचं काम वेगाने सुरु आहे. दरम्यान, भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आली असून, लवकरच अयोध्येतील राम मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात येणार आहे.

फेब्रुवारी २०२४ मध्ये अयोध्येमध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यानंतर राम मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले होणार आहे, अशी माहिती राम जन्मभूमी न्यासचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरीजी महाराज यांनी एबीपी माझाला दिली आहे.

२०२४ मध्ये नव्या गर्भगृहात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. २०२४ पर्यंत राम मंदिराचा पहिला मजला, गर्भगृहाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था होईल आणि दुसरीकडे मंदिरचे बांधकाम सुरु राहणार आहे. २०२५ पर्यंत पूर्ण मंदिराचे बांधकाम होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

रामजन्मभूमी मंदिराच्या उभारणीसोबतच प्रवासी सुविधा तयार करण्याचे कामही अयोध्येत सुरू करण्याची तयारी सुरू आहे. आयोध्येत मंदिराच्या उभारणीसोबतच प्रवाशांसाठी सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

गुंतवणूकदारांना एलआयसीने केले निराश

१९९३च्या मुंबई साखळी स्फोट प्रकरणी चौघे अटकेत

माथेरानमध्ये आता धावणार ई- रिक्षा

शरद पवारांच्या आशीर्वादाने राज्यात सरकार पुरस्कृत दहशतवाद!

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर २०१९ मध्ये अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीवर अंतिम निर्णय दिला होता. त्यानंतर ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. २०२५ पर्यंत राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल असे सांगण्यात येत आहे. पण त्याआधी भाविकांना राम मंदिर दर्शनासाठी खुले करण्याचा निर्णय रामजन्मभूमी न्यासातर्फे घेण्यात आल्याचे गोविंद दवे गिरी महाराज यांनी सांगितले आहे.

Exit mobile version