वर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानमध्ये झालेल्या भीषण भूकंपामुळे पृथ्वी हादरली आहे.रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ७.६ इतकी मोजण्यात आली आहे.मध्य समुद्रात उंच लाटा उसळल्यानंतर देशाच्या उत्तर-पश्चिम किनारपट्टी भागात सुनामीचा इशारा देण्यात आला असून येथून लोकांना हलवण्यात येत आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार निगाटा आणि टोयामा प्रांताच्या किनारपट्टी भागाला सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
जपानमधील NHKच्या वृत्तानुसार, भूकंपामुळे जपान समुद्र किनारपट्टीच्या काही भागात १ मीटर उंच लाटा उसळल्या.यापेक्षाही उंच लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.जपानच्या हवामान संस्थेने इशिकावा,निगाता आणि तोयामा या किनारी भागासाठी सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. रशियाने व्लादिवोस्तोक आणि नाखोडका या पूर्वेकडील शहरांमध्ये त्सुनामीचा इशाराही जारी केला आहे.जपानच्या नाटो क्षेत्रात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ११ भूकंपाचे धक्के नोंदवण्यात आले.
हे ही वाचा:
बाबरीचे पक्षकार अंसारी म्हणतात, पंतप्रधान मोदींनी अयोध्येचे रुपडे पालटले!
इस्रोकडून भारतीयांना नव्या वर्षाची भेट; XPoSAT चे यशस्वी प्रक्षेपण!
२२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा
आग्र्याची महिला प्रभू रामांच्या मूर्तीसाठी विणत आहे रेशीम वस्त्रे!
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा म्हणाले की, भूकंपामुळे ठीक- ठिकाणी झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन अधीकारी करत आहेत.त्यांनी जपानच्या लोकांना भूकंप आणि त्सुनामीपासून सावध राहण्याची सूचना केली आहे.तसेच त्यांनी त्सुनामी येण्याची शक्यता असलेल्या भागातील लोकांना शक्य तितक्या लवकर सुरक्षित ठिकाणी हलवण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली आहे.