पाकिस्तानी पत्रकाराला एस जयशंकर यांनी फटकारलं

पाकिस्तानी पत्रकाराने दहशदवादाबद्दल विचारले होते

पाकिस्तानी पत्रकाराला एस जयशंकर यांनी फटकारलं

केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानी पत्रकाराला खडेबोल सुनावले आहेत. पाकिस्तानी पत्रकाराने जयशंकर यांना दहशदवादाबद्दल विचारणा केली होती.

एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पाकिस्तानी पत्रकाराने एस जयशंकर यांना विचारले, कधीपर्यंत दक्षिण आशियाला नवी दिल्ली, काबूल आणि पाकिस्तानमधील दहशतवादाला सामोरं जावं लागणार आहे. यावर एस जयशंकर यांनी त्याला ‘तुम्ही चुकीच्या मंत्र्याला विचारणा करत आहात’ असं उत्तर दिलं. तसेच पाकिस्तान किती काळ दहशतवादाचा सराव करू इच्छितो हे तुम्हाला पाकिस्तानचे मंत्रीच सांगू शकतील, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत संबोधित करताना प्रमुख मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यावेळी दहशतवादाचा धोका अजून गंभीर झाला असल्याचं जयशंकर यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, आम्ही अल-कायदा, बोको हराम आणि अल शदाबसह त्यांच्या सहकारी संघटनांचा विस्तार होताना पाहिले आहे. दहशतवादाचे समकालीन केंद्र अद्यापही सक्रीय आहे. दक्षिण आशियात जुन्या पद्धती आणि स्थापित नेटवर्क अद्यापही आहेत, अशी त्यांनी माहिती दिली आहे.

हे ही वाचा : 

‘गांधी-गोडसे एक युद्ध’ मधून राजकुमार संतोषी काय सांगणार?

संजय राऊत म्हणातात, आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाला

हत्या झालेली वीणा कपूर आणि जिवंत वीणा कपूर यामुळे उडाला गोंधळ

नेमाडपंथी पुरोगामी अज्ञानपीठ

तसेच या परिषदेत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर जयशंकर यांनी सडेतोड उत्तर दिले. अल- कायदा म्होरक्या ओसामा बिन लादेनला आसरा देणाऱ्या आणि शेजारच्या राष्ट्रातील संसदेवर हल्ला करणारा देश सामर्थ्यशाली संयुक्त राष्ट्रांसमोर उपदेश देण्यास पात्र नाही, असं उत्तर जयशंकर यांनी दिले आहे.

Exit mobile version