कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याविषयी विविध अंदाज वर्तविले जात असताना आता ऑमिक्रॉन या नव्या व्हेरियन्टची चर्चा सुरू झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या नव्या व्हेरियन्टची माहिती उघड केली आहे.
डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, २४ नोव्हेंबरला हा व्हेरियन्ट प्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळला. त्यानंतर तो बोत्स्वाना, बेल्जियम, हाँगकाँग आणि इस्रायल येथेही दिसून आला.
या व्हेरियन्टची उत्पत्ती नेमकी कुठे झाली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञांच्या मते गौतेंग प्रांतात या व्हेरियन्टचा जन्म झाला असावा. जागतिक आरोग्य संघटनेने वेगाने पसरणारा व्हेरियन्ट म्हणून या ऑमिक्रॉनची गणना केली आहे. हा वेग लक्षात घेता विमानप्रवासावर निर्बंध घातले गेले आहेत. शिवाय, या व्हेरियन्टमुळे शेअर बाजारही कोसळला आहे.
या विषाणूच्या नव्या प्रकाराला B 1.1529 असे म्हटले जाते. नंतर त्याला ऑमिक्रॉन असे नाव पडले. ग्रीक भाषेतून हा शब्द आला असून या व्हेरियन्टमुळे कोविडची लागणी होण्याची शक्यता वाढते. भारतात मात्र या व्हेरियन्टची बाधा झालेला एकही रुग्ण अद्याप आढळलेला नाही. या व्हेरियन्टमुळे कोणताही असामान्य आजार होत असल्याचे मात्र समोर आलेले नाही. सध्याच्या लशी या व्हेरियन्टविरोधात किती प्रभावी आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हे ही वाचा:
किशोर खोखो संघांच्या कर्णधारपदी सोत्या वळवी आणि सानिका चाफे!!.
मुंबई हादरली! कुर्ल्यामध्ये तरुणीची बलात्कारानंतर हत्या
सीआयडीकडून परमबीर यांना दोन समन्स
‘अर्जुन खोतकर मॉल, कमर्शियल कॉम्प्लेक्ससाठी १०० एकर जागा हडपण्याच्या प्रयत्नात’
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी तसेच कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्याशी या नव्या व्हेरियन्टसंदर्भात चर्चा केली. पंतप्रधानांनी या व्हेरियन्टबद्दल चिंता प्रकट केली. राज्य आणि विविध जिल्ह्यांत या व्हेरिटन्टसंदर्भात चाचण्या आणि जागरुकता अभियान सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.