भारत-इस्रायल देणार दहशतवादाविरुद्धच्या लढाईला नवी दिशा

ओम बिर्ला यांनी इस्रायली अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत व्यक्त केला विश्वास

भारत-इस्रायल देणार दहशतवादाविरुद्धच्या लढाईला नवी दिशा

भारत आणि इस्रायलची संयुक्त रणनीती दहशतवादाविरुद्धच्या लढाईत जगाला नवी दिशा देईल, असा विश्वास लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केला आहे. इस्त्रायली संसदेचे अध्यक्ष अमीर ओहाना यांच्या नेतृत्वाखाली इस्रायलच्या संसदीय शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत ओम बिर्ला बोलत होते. इस्रायलच्या संसदेचेअध्यक्ष अमीर ओहाना यांच्या नेतृत्वाखाली एक इस्रायली संसदीय शिष्टमंडळ ३१ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत भारत दौऱ्यावर आले आहे. ओहाना यांची अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे.

या बैठकीत ओम बिर्ला यांनी वाढत्या दहशतवादाबद्दल इशारा दिला. दहशतवाद हा भारत आणि इस्रायलसाठी समान चिंतेचा विषय असल्याचे सांगून ओम बिर्ला यांनी भारत आणि इस्रायलसारख्या लोकशाही देशांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत सहकार्य वाढवण्याची गरज व्यक्त केली . भारत आणि इस्रायलची संयुक्त रणनीती दहशतवादाविरुद्धच्या लढाईत जगाला नवी दिशा देईल अशी अपेक्षा बिर्ला यांनी व्यक्त केली.

उभय देशांच्या संसदांमधील मजबूत संबंधांचा उल्लेख करून बिर्ला यांनी इस्रायलच्या संसदेत भारतासाठी संसदीय मित्र गट स्थापन केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. दोन्ही देशांच्या संसदेने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर एकत्र काम केले पाहिजे आणि त्यानुसार चर्चा आणि चर्चेच्या आधारे कृती आराखडा तयार केला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

भारतात स्थायिक झालेल्या ज्यू समुदायाचा उल्लेख करून बिर्ला म्हणाले की, भारताने ज्यूंना नेहमीच पाठिंबा दिला आहे. त्यांना सुरक्षित वातावरण दिले आहे. भारताच्या विकासात ज्यूंचे मोठे योगदान आहे, असेही ते म्हणाले. दोन्ही संसदांमधील मजबूत संसदीय संबंधांचा संदर्भ देत ओम बिर्ला यांनी नेसेटमध्ये भारतासाठी संसदीय मैत्री गट स्थापन केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

हे ही वाचा:

देशभरात रामनवमीच्या शोभायात्रांना केले ‘लक्ष्य’

अजित पवार न्यायालयापेक्षा मोठे झाले का?

घर खरेदी करा जुन्या रेडीरेकनर दरानेच

मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळला

पंतप्रधानांच्या भेटीनंतर भारत-इस्त्रायल संबंध अधिक दृढ
गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांमध्ये नियमित उच्चस्तरीय भेटी झाल्यांमुळे द्विपक्षीय संबंधांना नव्याने बळकटी आली आहे. आहे. २०१७ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इस्रायल दौरा आणि त्यानंतर २०१८ मध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या भारत भेटीपासून भारत-इस्त्रायल संबंध अधिक दृढ झाले आहेत, असेही ओम बिर्ला यांनी नमूद केले. दोन्ही संसदांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर एकत्र काम केले पाहिजे यावर बिर्ला यांनी भर दिला. त्यानुसार सामूहिक चर्चा व संवादाच्या आधारे कृती आराखडा तयार करावा असे सुचवले.

Exit mobile version