इस्रायलविरुद्ध इस्लामिक राष्ट्र आक्रमक, ‘ही’ कारवाई करणार

इस्रायलविरुद्ध इस्लामिक राष्ट्र आक्रमक, ‘ही’ कारवाई करणार

इस्रायल आणि पॅलेस्टाईनची अतिरेकी संघटना हमास यांच्यातील संघर्ष काही नवा नाही, परंतु हा संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलाय. पॅलेस्टाईन आणि इस्रायली सुरक्षा दलांमध्ये गेल्या आठवड्यात शुक्रवारी रात्री जेरूसलेमच्या अल अक्सा मशिदीत हिंसक चकमक झाली. आता इस्रायल आणि हमास यांच्यातील चकमकीचं परिवर्तन हवाई आणि रॉकेट हल्ल्यांमध्ये झालंय. या हवाई हल्ल्यात दोन्ही बाजूंनी बरेच लोक ठार झाल्याचे वृत्त आहे.

सर्व इस्लामी देश पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ पुढे आलेत. ५७ सदस्य इस्लामिक देशांची संघटनेनं (ओआयसी) इस्रायलच्या कारवाईचा निषेध व्यक्त करत एक संयुक्त निवेदन जारी केलेय. पाकिस्तानने आपल्या ठरावात इस्रायली कारवाईसंदर्भात संयुक्त निवेदनांची मागणी केली. पाकिस्तानच्या या प्रस्तावाला ओआयसीमध्ये एकमताने पाठिंबा दर्शविला गेला.

डॉनच्या वृत्तानुसार, न्यूयॉर्कमध्ये या विषयावरील बैठकीत तुर्की आणि सौदी अरेबियाच्या राजदूतांच्या महासभेचे विशेष अधिवेशन बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळण्याच्या प्रस्तावाला मान्यताही देण्यात आली. इस्लामिक सहयोग संघटनेच्या राजदूतांनी संयुक्त राष्ट्र संघात हा प्रश्न उपस्थित करण्यासाठी सदस्य देशांचा एक गट तयार केलाय. पाकिस्तानही या गटाचा महत्त्वाचा सदस्य आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान जिल्हाधिकाऱ्यांना देणार कानमंत्र

मुंबई महानगरपालिकेकडून लसींसाठी ग्लोबल टेंडर

उपमुख्यमंत्र्यांची ‘सोशल’ उधळपट्टी

मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला झापले

यूएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी मंगळवारी जारी केलेल्या स्वतंत्र निवेदनात म्हटले आहे की, पॅलेस्टाईनच्या भूभागातील हिंसाचाराबद्दल त्यांना गंभीर चिंता आहे. इस्रायली सुरक्षा दल आणि पॅलेस्टाईन समर्थकांमध्ये शांतता पूर्ववत होण्याची मागणी संयुक्त राष्ट्र संघटनेने केली होती.

Exit mobile version