जॉर्जियाकडून ऑक्टोबर महिना ‘हिंदू हेरिटेज मंथ’ म्हणून घोषित

राज्यातील हिंदू-अमेरिकन समुदायाचे योगदान लक्षात घेऊन निर्णय

जॉर्जियाकडून ऑक्टोबर महिना ‘हिंदू हेरिटेज मंथ’ म्हणून घोषित

अमेरिकेतील जॉर्जिया राज्याने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जॉर्जिया राज्याने ऑक्टोबर महिना हा अधिकृतपणे ‘हिंदू हेरिटेज मंथ’ म्हणून घोषित केला आहे. जॉर्जियन गव्हर्नर ब्रायन केम्प यांनी या निर्णयाला मान्यता दिली आहे. या महत्त्वाच्या निर्णयानंतर या घोषणेबद्दल अमेरिकेतील अनेक हिंदू संघटनांनी जॉर्जियाचे गव्हर्नर ब्रायन केम्प यांचे आभार मानले आहेत.

जॉर्जियातील हिंदू संघटना अनेक दिवसांपासून हिंदू हेरिटेज मंथ या संकल्पनेची मागणी करत होत्या. ऑक्टोबर महिना हिंदूंसाठी खूप खास मानला जातो. या महिन्याची खास सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख आहे. या महिन्यात महात्मा गांधींचा जन्मदिवस २ ऑक्टोबरला येतो, त्याचप्रमाणे नवरात्री आणि दिवाळी असे सणही सहसा याच महिन्यात येतात. एकूणच राज्यातील हिंदू-अमेरिकन समुदायाचे योगदान लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

हे ही वाचा:

नेहरू मेमोरियल म्युझियम ऍन्ड लायब्ररीच्या नामांतराला राष्ट्रपतींकडून मंजुरी

पर्यटनक्षेत्र विकासासाठी आवश्यक निधी देणार

माध्यमांनी सामाजिक जाणिवा वाढवायला हव्यात!

लोकसहभाग वाढवून ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान यशस्वी करा!

गव्हर्नर ब्रायन केम्प म्हणाले की, हिंदू वारसा महिना हा भारतीय संस्कृती आणि तिथे रुजलेल्या विविध आध्यात्मिक परंपरांवर लक्ष केंद्रित करून साजरा केला जाईल. याआधी २३ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात, गव्हर्नर म्हणाले होते की, हिंदू-अमेरिकन समुदायाने जॉर्जियन लोकांचे जीवन समृद्ध करून राज्याच्या जीवन शक्तीसाठी मोठे योगदान दिले आहे.

Exit mobile version