‘टायटॅनिक’चे अवशेष पाहण्यासाठी रिकामा करावा लागतो खिसा

ओशनगेट या कंपनीने २०२१ मध्ये टायटॅनिक सर्वेक्षण मोहीम प्रकल्प सुरू केला

‘टायटॅनिक’चे अवशेष पाहण्यासाठी रिकामा करावा लागतो खिसा

टायटॅनिक जहाजाचे नाव आपण सर्वांनी ऐकले आहे. एका शतकापूर्वीच्या काळातील सर्वात मोठे आणि लोकप्रिय जहाज म्हणून गणना करण्यात आलेल्या टायटॅनिकची लांबी सुमारे २६९.१ मीटर आणि रुंदी सुमारे २८ मीटर होती. १४ एप्रिल १९१२ रोजी मध्यरात्री टायटॅनिक एका हिमखंडावर आदळले आणि उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले. त्याचे अवशेष नंतर ७३ वर्षांनी म्हणजे १९८५ मध्ये सापडले. या टायटॅनिकवर चित्रपटही निघाला पण त्या जहाजाविषयी अजूनही लोकांच्या मनात कुतुहल आहे. ओशन गेट नावाची एक कंपनी आहे, जी लोकांना पाणबुडीत बसवून टायटॅनिकचे भग्नावशेष दाखवण्यासाठी समुद्रात घेऊन जाते.

पाणबुडी अचानक गायब झाली

अलीकडेच ४ दिवसांपूर्वी अटलांटिक महासागरात टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी आलेली ‘टायटन’ नावाची पर्यटक पाणबुडी दक्षिण-पूर्व कॅनडाच्या समुद्रात अचानक गायब झाली. त्यात कॅप्टनसह पाच जण होते. ज्यामध्ये ब्रिटनचा अब्जाधीश उद्योगपती हमिश हार्डिंग यांचा समावेश आहे. नामिबियातून आठ चित्ते आणण्याच्या प्रॉजेक्टमध्ये हमीशने भारत सरकार सोबत काम केले. याशिवाय पाकिस्तानचे प्रसिद्ध उद्योगपती प्रिन्स दाऊदही त्यांचा मुलगा सुलेमानसह या पाणबुडीत होते. त्यांच्याशिवाय आणखी एक प्रवासीही होता. सध्या पाणबुडीचा शोध सुरू आहे. जगाचे कुतुहून जागवणाऱ्या या टायटॅनिक जहाजाचे अवशेष कसे पाहता येतील आणि त्याची किंमत किती असेल हे जाणून घेऊया.

टायटॅनिकचे भग्नावशेष पाहायचेत मग एवढे खर्च करा!

सागरी जगाचा शोध घेणाऱ्या ओशनगेट या कंपनीने २०२१ मध्ये टायटॅनिक सर्वेक्षण मोहीम प्रकल्प सुरू केला. ज्यामध्ये ती लोकांना समुद्रात असलेले टायटॅनिकचे अवशेष दाखवण्यासाठी पाणबुडीत बसवून तीन किलोमीटर खाली समुद्राच्या तळाशी घेऊन जाते. वॉशिंग्टन पोस्टच्या मते, या मोहिमेसाठी प्रति व्यक्ती खर्च हा सुमारे अडीच लाख डॉलर्स, म्हणजेच प्रति व्यक्ती २ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे लोक या प्रवासाला जाण्यास पात्र आहेत.

हे ही वाचा:

विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची मोदींशी भेट…भारताच्या उज्ज्वल भवितव्याची दिली ग्वाही

मी ग्रेट आहे कारण मी हिंदू आहे, हे ठासून सांगा!

कोविड घोटाळा प्रकरणी संजय राऊत, आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर ईडीच्या धाडी

मणिपूरमध्ये कुटुंबाच्या रक्षणासाठी गावकऱ्यांनी उचलले शस्त्र; बंकरमध्ये वास्तव्य

 

मलबा आणि अवशेष १२ हजार ५०० फूट खोलीवर आहे

टायटॅनिकच्या या सफरीबद्दल कंपनी म्हणते की ते जास्तीत जास्त १२ हजार ८०० फूट खोलीपर्यंत जाऊ शकतात. टायटॅनिकचे अवशेष कॅनडातील न्यूफाउंडलँडच्या दक्षिणेस सुमारे ३७० मैल अंतरावर साडेबारा हजार फूट खोलीवर आहे. प्रति व्यक्ती खर्चामध्ये सेंट जॉन्स, न्यूफाउंडलँड येथून ये-जा करण्यासाठी असलेली वाहतूक समाविष्ट नाही.

Exit mobile version