भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त करून नेदरलँडचे नेते गीर्ट वाइल्डर्स यांनी त्यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांनी शर्मा यांचे ‘शूर महिला’ असे कौतुक करून त्यांना ‘स्वातंत्र्याचे प्रतीक’ असे संबोधले. गेल्या वर्षी एका टीव्हीवरील चर्चेदरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपने शर्मा यांना निलंबित केले होते.
नुपूर शर्मा यांच्याशी चर्चा झाल्याचे वाइल्डर्स यांनी सांगितले. ‘नुपूर शर्मा यांच्याशी आज फोनवर चर्चा झाली. त्या केवळ भारताच्याच नव्हे तर, संपूर्ण स्वतंत्र जगाच्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहेत. गेल्या दोन वर्षांत त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचे नुकसान झाले आणि कायदेशीर अडचणींना त्यांना सामोरे जावे लागले. जे अयोग्य होते. कारण त्यांनी काहीही केलेले नाही. त्या एक शूर महिला आहेत,’ असे वाइल्डर्स यांनी लिहिले आहे.
याआधी फेब्रुवारीतही वाइल्डर्स यांनी शर्मा यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. ‘मी शूर नुपूर शर्मा यांना समर्थन देण्यासाठी एक वैयक्तिक संदेश पाठवला आहे. ज्यांना केवळ सत्य बोलण्यासाठी इस्लामचे पालन करणाऱ्यांकडून धमक्या मिळाल्या होत्या. स्वातंत्र्यावर प्रेम करणाऱ्या जगभरातील लोकांनी त्यांचे समर्थन केले पाहिजे. मला आशा आहे की, भारत दौऱ्यादरम्यान मी त्यांची भेट घेऊ शकेन,’ असे त्यांनी सोशल मीडियावर लिहिले होते.
हे ही वाचा:
एलन मस्क यांनी टाकले मार्क झुकेरबर्गला मागे!
‘अनिल मसिह यांना विचारू, असे का केले?’
हिंदू तरुणाला इस्लाम धर्म स्वीकारून कलमा वाचायला लावला!
निमिष मुळे, झारा बक्षी सर्वोत्तम जलतरणपटू
गेल्या वर्षी निवडणूक जिंकल्यानंतर वाइल्डर्स यांनी हिंदूंचे समर्थक असल्याचे सांगितले होते. ‘डच निवडणूक जिंकल्यानंतर मला अनेक संदेश पाठवणाऱ्या जगभरातील माझ्या मित्रांचे आभार. भारतातून अनेक संदेश येत आहेत. बांग्लादेश, पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या आणि केवळ हिंदू आहेत म्हणून छळ होणऱ्या, धमकावल्या जाणाऱ्या हिंदूंचे मी कायम समर्थन करेन,’ असे त्यांनी म्हटले होते.