देशामधील कोरोना बाधितांची संख्या अनेक दिवसांनी २० हजारांच्या खाली आली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात ३० ते ४० हजारांच्या दरम्यान कोरोना रुग्ण आढळत होते. त्यानंतर तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा धोकाही व्यक्त केला होता. गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे १८,८७० नवे रुग्ण आढळले आहेत. तर ३७८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये ९,६८६ रुग्णांची घट झालेली आहे ही दिलासादायक बाब आहे.
मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आलेली आहे. तसेच त्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्याही ३००- ३५० च्या घरात असल्याची नोंद होती. मात्र बुधवारी अचानक ही रुग्णसंख्या ५०० च्या वर गेली आहे. राज्यातील दैनंदिन रुग्ण व मृत्यूसंख्येत घट झालेली आहे. तसेच सक्रीय रुग्णांचा आलेखही चांगलाच घसरता आहे. सध्याच्या घडीला राज्यामध्ये ३६ हजार ७९४ रुग्ण उपचाराधीन आहेत.
मुख्य म्हणजे देशामध्ये सध्याच्या घडीला कोरोनाविरोधात लढ्यामध्ये लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. देशव्यापी मोहिमेत आत्तापर्यंत ८५.४२ कोटींपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण झालेले आहे. भारतासारख्या लोकसंख्या असलेल्या देशात कोरोना लसीकरण राबविणे ही उल्लेखनीय कामगिरीच म्हणावी लागेल.
हे ही वाचा:
खळबळजनक! मुंबईच्या केईएममध्ये एमबीबीएसच्या २९ विद्यार्थ्यांना कोरोना
गृह खात्याचे उपसचिव कैलास गायकवाड ईडीसमोर जाणार?
‘खासगी रुग्णालयांनी केली कोरोना रुग्णांची सर्वाधिक लूट’
… आता निश्चितच काँग्रेसमध्ये राहणार नाही
भारतात सर्वाधिक चिंता केरळने वाढवली होती. तिथेही आता रुग्णांची संख्या कमी होत आहे. आत्ताच्या घडीला राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांकडे ४.५७ कोटी लस मात्रा उपलब्ध आहेत. कोरोना रुग्णांचा आलेख पाहता सध्याच्या घडीला रुग्णसंख्या रोडावलेली दिसून येत आहे. सध्याच्या घडीला रुग्णसंख्या बरे होण्याचे प्रमाण हे ९८ टक्के इतके आहेत. तर उपचाराधीन रुग्ण हे केवळ ०.८४ टक्के आहे.