राज्यातील निर्बंध शिथिल झाल्यावर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात आली. या निर्णयामुळे रेल्वे स्थानकांमध्ये गर्दी वाढल्याचे चित्र आहे. कल्याण रेल्वे स्थानकातही प्रवाशांची गर्दी वाढलेली असताना गर्दुल्ले, भिकारी यांचा वावरही वाढला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसंबंधी चिंता व्यक्त केली जात आहे.
कल्याण रेल्वे स्थानकावरील सात प्लॅटफॉर्म आणि पादचारी पुलावर गर्दुल्ले आणि भिकारी यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केली जाते, मग यांच्यावर का कारवाई केली जात नाही, असा आरोप प्रवासी करत आहेत.
हे ही वाचा:
हिंदुत्वाचे महामेरू कल्याण सिंह कालवश
पंतप्रधान मोदींचे खास संस्कृत ट्विट! म्हणाले…
“आमच्या सहनशक्तीच्या अंत पाहू नका…” मुफ्तींची मुक्ताफळे
कल्याण सिंह यांच्या निधनानाने उत्तर प्रदेशात ३ दिवसांचा दुखवटा
याबाबत रेल्वे स्थानकातील अधिकाऱ्यांकडे बोलले असता त्यांनी याविषयी बोलण्यास नकार देत रेल्वे स्थानकामध्ये स्वच्छता आणि कोरोनाचे नियम पाळले जातात. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले. गर्दुल्ले आणि भिकारी यांच्यावर कारवाई करत नसल्यामुळे सध्या कल्याण रेल्वे स्थानकातील प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर आहे.
रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांकडूनही कोरोना नियमांचे पालन न केल्याचे दिसून येत आहे. रेल्वे स्थानकामध्ये नियमांमध्ये न बसणाऱ्या प्रवाशांना बंदी आहे. मात्र रेल्वे स्थानक परिसरात असलेले अनेक रिक्षा आणि टॅक्सी चालक थेट रेल्वे स्थानकावर येऊन प्रवाशांकडे रिक्षा, टॅक्सी हवी आहे का? अशी विचारणा करतात.