अमेरिकेतील भारतीयांचा कृषी कायद्यांना पाठिंबा

अमेरिकेतील भारतीयांचा कृषी कायद्यांना पाठिंबा

भारतातील कृषी कायद्यांना परदेशातून स्वघोषित पर्यावरणप्रेमी मंडळींकडून विरोध करण्याचा प्रयत्न होत असतानाच, जनमानसातून मात्र वेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. सॅन फ्रान्सिस्को येथील अनिवासी भारतीयांनी या कायद्याच्या समर्थनार्थ कार रॅलीचे आयोजन केले होते. सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये स्थानिक प्रमाणवेळेनुसार रविवारी सकाळी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

हे ही वाचा:

मोदींनी केली कृषी कायद्यांची पाठराखण

या परिसरातल्या मिशन सॅन जोश हायस्कुलच्या पार्किंगमध्ये पूर्व प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता या रॅलीचे आयोजन केले होते. कृषी कायद्यांना असलेले आपले समर्थन दाखविण्यासाठी अनेक अनिवासी भारतीयांनी या रॅलीत सहभाग नोंदवला. रॅली नंतर वंदे मातरम् अशा घोषणाही देण्यात आल्या.

बायडन यांच्या प्रशासनाने यापूर्वीच भारतातील कृषी कायद्यांना अमेरिकेचा असलेला पाठिंबा दर्शवला होता. यावेळी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या सचिवांनी या कायद्यांचे वर्णन कार्यक्षमता वाढविणारे असे केले होते. यावेळी बोलताना त्यांनी असेही म्हटले होते, की शांततापूर्ण पद्धतीने केली जाणारी निदर्शने हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे. चर्चेद्वारे दोन्ही पक्षांनी याबाबत तोडगा काढवा असे आवाहन देखील त्यांनी केले होते, मात्र त्यासोबत पुढे या कायद्यामुंळे कृषी क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल असेही त्यांनी म्हटले होते.

Exit mobile version