“भारताला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे”, प्रिन्स चार्ल्स

“भारताला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे”, प्रिन्स चार्ल्स

भारताने संकटकाळात सर्व जगाची मदत केली आहे, त्यामुळे आता भारताला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे अशा शब्दात इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स यांनी भारताप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

ब्रिटिश आशिया ट्रस्टच्या वतीने सध्या कोविडच्या महामारीचा सामना करणाऱ्या भारताला सहाय्य करण्याची मोहिम सुरू करण्यात आली. यात अनेक भारतीय वंशाचे नागरिक सामिल आहेत. या मोहिमेच्या प्रारंभी प्रिन्स चार्ल्स यांनी बोलताना या भावना व्यक्त केल्या आहेत.

हे ही वाचा:

सुनील मानेच्या शिवसेना कनेक्शनची चौकशी करा

कोविडकाळात नागरिकांना सैन्याची साथ

लसीकरण केंद्रावरील गर्दी कधी ‘ब्रेक’ होणार?

कोरोना रुग्णांसाठी अजय देवगणकडून १ कोटींची मदत

प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनच्या राजघराण्यातील वारस आहेत. त्यांनी यावेळी बोलताना आपल्या अनेक भारतभेटींच्या आठवणी जाग्या केल्या. त्यावेळी ते म्हणाले की, इतर अनेकांप्रमाणे माला देखील भारताबद्दल खूप प्रेम आहे. भारताने संकट काळात इतर अनेक देशांना मदत केली आहे. त्यामुळे आता भारताच्या संकट काळात त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. या शब्दात प्रिन्स चार्ल्स यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली.

गेल्या वर्षभरापासून आपण या महामारीचे भीषण रुप पाहत आहोत. परंतु गेल्या आठवड्यातील चित्र पाहून मी व्यथित झालो आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन भारताला मदत पोहोचवली पाहिजे. भारातने कोरोनाच्या काळात इतर अनेक देशांना मदत केली आहे. भारतीय मदतीमुळे कोरोनाच्या पहिल्या लाटेवर मात करणे शक्य झाले होते. आता त्याची परतफेड करायची वेळ आली आहे. असे देखील प्रिन्स चार्ल्स यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी ऑक्सिजन फॉर इंडिया या मोहिमेचे देखील उद्घाटन केले.

प्रिन्स चार्ल्स यांनी आत्तापर्यंत एकूण १० वेळेला भारताल भेट दिलेली आहे.

Exit mobile version