आता अमेरिकेकडून ७.४१ अब्ज रुपयांची मदत

आता अमेरिकेकडून ७.४१ अब्ज रुपयांची मदत

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतातील परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताच्या या कोरोना विरोधातल्या लढ्यासाठी जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. अमेरिकेनेही या कामाता आता पुढाकार घेतला असून येत्या आठवड्यात भारताला ७.४१ अब्ज रुपयांच्या साहित्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचं व्हाईट हाऊसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. कच्च्या मालाचा पुरवठा करण्यासाठी नकार देणाऱ्या अमेरिकेच्या भूमिकेतील हा बदल दिलासा देणारा आहे.

भारताच्या या कोरोना विरोधातल्या लढ्यामध्ये अमेरिका भारताला शक्य तितकी मदत करेल आणि भारताच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिल असं व्हाईट हाऊसच्या एका निवेदनात सांगण्यात आलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारताला या आठवडाभरात ७.४१ अब्ज रुपयांच्या कोरोना संबंधित साहित्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. या साहित्यामध्ये १००० ऑक्सिजनचे सिलेंडर, १.५ कोटी एन-९५ मास्क आणि दहा लाख रॅपिड डायग्नोस्टिक चाचण्या यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

लसीकरणासाठी दोन किलोमीटरपर्यंत रांगा

सुनील मानेकडे प्रियदर्शनी पार्क ते अँटेलियाचे नकाशे

पंकजा मुंडेंना कोरोनाची लागण

व्हाईट हाऊसने लस उत्पादक कंपनीला कोविशील्ड लस भारताला देण्याचे  निर्देश दिले आहेत. लवकरात लवकर कोरोनाच्या अतिरिक्त लसींचे उत्पादन करावं आणि ते भारताला पाठवावं. भारताला मदत करण्यासाठी अमेरिकेने कोविशील्डचे दोन कोटीपेक्षा अधिक डोस देण्याची परवानगी दिली आहे.

Exit mobile version