टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर आता सुरू होणाऱ्या दिव्यांग खेळाडूंच्या पॅरालिम्पिक स्पर्धेवर साऱ्या देशाचे लक्ष लागून आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या यशानंतर आता ५४ भारतीय खेळाडूंना पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी क्रीडा मंत्रालयाकडून निरोप देण्यात आला. हे खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करून यशस्वी होतील, असा विश्वास कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला. नऊ खेळांच्या प्रकारात भारताकडून ५४ खेळाडू सहभागी होत आहेत. २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये देवेंद्र झाझारिया, मरियप्पन थांगावेलू (उंच उडी) आणि जागतिक विजेता संदीप चौधरी (भालाफेक) यांच्याकडून भारतीयांना मोठ्या अपेक्षा आहेत.
गेल्या वेळेस झालेल्या रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये मरियप्पनने सुवर्णपदक जिंकले होते. यंदाच्या वर्षी होणाऱ्या टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये तो भारतीय पथकाचा ध्वजधारक असणार आहे.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारची गोंधळवृत्ती; शिष्यवृत्ती परीक्षा फक्त मुंबईत रद्द
दोन लसी घेतलेल्यांचे ‘तिकीट कापले’
मराठा समाजाचा आरक्षणाचा मार्ग होणार का मोकळा?
फी कपातीच्या विषयात ठाकरे सरकारची पळवाट, अध्यादेश ऐवजी शासकीय आदेश
राष्ट्रीय पुरस्कार लांबणीवर
मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदा हा वितरण सोहळा लांबणीवर जाणार आहे. या पुरस्कारासाठी खेळाडूंची निवड करण्याकरिता क्रीडा खात्याने समिती नेमली आहे. परंतु ऑलिम्पिकमधील खेळाडूंसोबतच पॅरालिम्पिक स्पर्धेत खेळाडूंकडून पदकाची आशा आहे आणि त्यांच्या निवडीसाठी हा पुरस्कार सोहळा पुढे ढकलावा, अशी मागणी या समितीने केली होती. खेळाडूंकडून पदकविजेती कामगिरी अपेक्षित आहे असे, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.