रशियाने मॉस्को युरोप परिषदेतून माघार घेतली आहे. रशिया परराष्ट्र मंत्रालयाने आघाडीच्या मानवाधिकार संघटनेतून बाहेर पडण्याच्या रशियाच्या निर्णयाची औपचारिक सूचना युरोप परिषदेचे सरचिटणीस मारिजा पेजिनोवी बुरिक यांना दिली आहे. रशियाचे सदस्यत्व निलंबित करण्यासाठी युरोप परिषदेच्या निर्णयानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
युरोप परिषद रशियावर दबाव आणत असल्याचे आरोप रशिया मंत्रालयाने केला आहे. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (नाटो) आणि युरोपियन युनियन यांच्यावर रशियन मंत्रालयाने आरोप केला आहे. अशी माहिती रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
ब्रिटनने रशियाची चैनीच्या वस्तूंची निर्यात थांबवली. तर ब्रिटनने व्यापार आघाडीवर रशियाच्या विरोधात पावले उचलली आहेत. ब्रिटनने रशियाला ‘हाय-एंड’ लक्झरी वस्तूंच्या निर्यातीवर बंदीसह व्होडकासारख्या प्रमुख रशियन उत्पादनांवर नवीन आयात शुल्क जाहीर केले आहे. या निर्णयामुळे रशियाच्या लोकप्रिय उत्पादनांपैकी वोडकावर परिणाम होणार आहे. त्याच वेळी, रशियाला लक्झरी वस्तूंच्या निर्यातीवर बंदी घातल्याने ऑटोमोबाईल, हाय-एंड फॅशन आणि कलात्मक क्षेत्रांवर परिणाम होईल. या सर्व निर्बंधामुळे रशियाने युरोप परिषदेतून माघार घेतली आहे.
हे ही वाचा:
माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे निधन
….म्हणून भाजपाच्या खासदारांच्या मुलांना तिकीट नाही!
आजपासून १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण
महाराष्ट्र गुजरात सीमावाद लवकरच संपणार
युरोप परिषदेची स्थापना १९४९ मध्ये झाली आहे. रशियाने ह्या परिषदेत १९९६ मध्ये सामील झाला. दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झाल्यापासून मानवी हक्क आणि कायद्याचे राज्य राखण्याचे काम पॅन-युरोपियन गटातून सोडणारा रशिया हा दुसरा देश आहे.यापूर्वी ग्रीसने १९६९ मध्ये देखील असेच केले होते. लष्करी उठावात लष्करी अधिकार्यांच्या गटाने सत्ता काबीज केल्यानंतर हकालपट्टी टाळण्यासाठी ग्रीसने परिषदेतून माघार घेतली होती. पण पुन्हा पाच वर्षांनंतर लोकशाही पुनर्संचयित करून ते पुन्हा परिषदेत सामील झाले.