25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरअर्थजगतआता गांजा लावून पाकिस्तान गाठणार आर्थिक उच्चांक

आता गांजा लावून पाकिस्तान गाठणार आर्थिक उच्चांक

त्यासाठी स्थापन केले खास प्राधिकरण

Google News Follow

Related

पाकिस्तानने गांजाची लागवड आणि व्यापार व्यवस्थापित आणि नियंत्रित करण्यासाठी नियामक प्राधिकरण स्थापन केले आहे. देशाच्या स्थापनेपासून सर्वांत वाईट आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला आता अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी गांजाचा आधार घ्यावा लागत आहे.

औषधी उद्देशांसाठी कायदेशीररीत्या गांजाचे उत्पादन करण्याचा पाकिस्तान सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे आर्थिक संकटात गांजा आणि संबंधित उत्पादने निर्यात करण्याचा मार्ग मोकळा होईल. फेब्रुवारीमध्ये, पाकिस्तान सरकारने एक अध्यादेश काढून गांजा नियंत्रण आणि नियामक प्राधिकरणाची (सीसीआरए) स्थापना केली आहे. हे प्राधिकरण ‘वैद्यकीय आणि औद्योगिक उद्देशांसाठी गांजाची लागवड, शुद्धीकरण, उत्पादन आणि विक्रीचे नियमन करण्यासाठी’ जबाबदार असेल.

जागतिक गांजाच्या बाजारपेठेत प्रवेश करून त्याचा फायदा घेण्यास पाकिस्तान उत्सुक आहे. पाकिस्तान कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (पीसीएसआयआर) चे अध्यक्ष सय्यद हुसैन अबिदी यांनी अल जझीराला सांगितले की, इस्लामिक रिपब्लिक आपल्या परकीय गंगाजळीत वाढ करण्यासाठी निर्यात, परदेशी गुंतवणूक आणि देशांतर्गत विक्रीद्वारे महसूल मिळवण्यासाठी गांजाचा वापर करू शकतो. गांजापासून पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला खरोखरच खूप आवश्यक लाभ मिळू शकतील.

आशियाई विकास बँकेच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमधील चलनवाढीचा दर २५ टक्क्यांवर गेला आहे आणि आर्थिक वाढ केवळ १.९ टक्के आहे. मे २०२२पासून ओढवलेले आर्थिक संकट हे देशाच्या स्थापनेपासूनचे पाकिस्तानचे सर्वांत वाईट संकट आहे. गांजा नियामक प्राधिकरणामध्ये अनेक सरकारी विभाग, गुप्तचर संस्था आणि खाजगी क्षेत्रातील व्यक्तींसह १३ सदस्य असतील. इम्रान खान पंतप्रधान असताना सन २०२०मध्ये अशा प्रकारची संस्था बनवण्याची सूचना पहिल्यांदा करण्यात आली होती. जागतिक गांजाची बाजारपेठ यावर्षी ६४.७३ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे.

औषधी कारणांसाठी गांजाचा वापर

गांजाचा वापर केवळ नशेसाठी नव्हे तर त्याचा उपयोग औषधी कारणांसाठीही केला जातो. चिंता, नैराश्य आणि तीव्र वेदनांसाठी गांजापासून उत्पादित केलेली औषधे लिहून दिली जातात. ‘गांजाचा गैरवापर शक्य आहे, परंतु इफेड्रिन (कमी रक्तदाबावर उपचार करण्यासाठी वापरले जाणारे) एक जीवरक्षक औषध आहे आणि त्याचाही गैरवापर केला जातो,’ असे पाकिस्तानी आरोग्यसेवेतील व्यावसायिक अदनान अमीन यांनी निक्की एशियाला सांगितले.

हे ही वाचा:

मालदीवची अक्कल ठिकाण्यावर आली; भारतीयांसाठी पायघड्या

चारधाम यात्रेला दणदणीत प्रतिसाद

खलिस्तानी गुरुपतवंत पन्नू प्रकरणी रशिया भारताच्या पाठीशी

‘पाईपने भरलेल्या ट्रकमध्ये सापडले ८ कोटी’

गैरवापर करणाऱ्याला दंड

नियमभंग करणाऱ्या आणि करमणुकीच्या उद्देशाने गांजा विकत घेणाऱ्या लोकांसाठी कठोर दंड आहेत: एका व्यक्तीसाठी १० लाख पाकिस्तानी रुपयांपासून एक कोटी रुपयांचा दंड आहे. तर, कंपन्यांसाठी एक कोटी रुपयांपासून दोन कोटी पाकिस्तान रुपयांपर्यंतचा दंड आहे. यामुळे खैबर पख्तुनख्वा भागातील अवैध शेती थांबेल. आता, सरकारला औषधी गांजापासून महसूल मिळू शकेल, अशी आशा व्यक्त केल जात आहे. परवानाही पाच वर्षांच्या कालावधीसाठी दिला जाईल. कायदेशीररित्या गांजा कुठे पिकवता येईल, हेदेखील सरकार ठरवेल.

‘जेव्हा अफगाणिस्तानमध्ये गांजाची लागवड केली जात असे, तेव्हा आम्हाला तोटा होत असे. त्याचा उत्पादन खर्चही आम्ही वसूल करू शकलो नाही. परंतु तालिबानने बंदी घातली असल्याने आमचा व्यवसाय चांगला चालला आहे,’ असे एका शेतकऱ्याने अल जझीराला सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा