क्रांतिकारक पाऊल; सौदी अरेबियात परिक्षा केंद्रात हिजाब बंदी

सौदी अरेबियाच्या राजांनी घेतला निर्णय

क्रांतिकारक पाऊल; सौदी अरेबियात परिक्षा केंद्रात हिजाब बंदी

इकडे भारतात पहले हिजाब, फिर किताबचे नारे काही महिन्यांपूर्वी लागले होते. शैक्षणिक संस्थांमध्येही आम्हाला हिजाब घालायला मिळाला पाहिजे, तो आमचा अधिकार आहे, अशी मागणी करत काही विद्यार्थींनींनी कर्नाटकमध्ये आंदोलन केले होते. ते आंदोलन नंतर देशभरात विविध ठिकाणी पसरले. पण तिकडे मुस्लिम राष्ट्र असलेल्या सौदी अरेबियात मात्र वेगळीच परिस्थिती आहे. तिथे परिक्षा केंद्रात हिजाब घालण्यास चक्क मनाई करण्यात आली आहे. सौदी सरकारने परीक्षा केंद्रात हिजाब घालण्यावर बंदी घातली आहे.

सौदी अरेबियाच्या एज्युकेशन अँड ट्रेनिंग इव्हॅल्युएशन अँड कमिशनने (ईटीईसी) परीक्षा केंद्रात हिजाबवर बंदी घातली आहे. सौदी अरेबियात शरिया कायद्याची अंमलबजावणी केली जाते, ज्यात महिलांना सार्वजनिक ठिकाणी हिजाब आणि बुरखा घालणे अनिवार्य असते.

हे ही वाचा:

मुक्ता टिळक यांचे कर्त्यव्य आणि ध्येयनिष्ठा हा सर्वांसाठीच आदर्श

जयंतराव पाटील, काल काय झालं ते बरं हाय का?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मास्क सक्ती नाहीच.

कोरोनाची लस घ्या आता नाकातून

 

सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद बिन सलमान यांनी परिक्षा केंद्रात हिजाब घालण्यास मनाई करणारा आदेश काढला. तरीही अजून तेथील महिलांच्या हा निर्णय पचनी पडलेला नाही. सौदी अरेबियात हे पाऊल उचलले गेले असताना तिकडे इराणमध्ये मात्र हिजाब नाकारणाऱ्या महिलांवर कठोर कारवाई केली जात आहे. हिजाबला विरोध करणाऱ्यांना तर फाशी देण्यात आली आहे.

दुसरीकडे लोकशाही असलेल्या भारतात मात्र हिजाब घालायला मिळाला पाहिजे अशी मागणी काही विद्यार्थींनीनी कर्नाटकमध्ये केली होती. त्याला भारतातील तथाकथित पुरोगाम्यांनी पाठिंबा दिला होता. महिलांना आपल्या कपड्यांची निवड करण्याचा अधिकार आहे, असा युक्तिवाद त्यासाठी करण्यात येत होता. कर्नाटकमधील उडुपी येथे हे आंदोलन सर्वप्रथम केले गेले. त्यात मुस्कान खान नावाची मुलगी चर्चेत आली होती. तिने हिजाब घालण्याची परवानगी नसल्यामुळे शाळेत जाणेही सोडले.

Exit mobile version