आता दोन मिनटात बनवा ‘थंडगार बिअर’

पावडर मुळे इन्स्टंट बनविता येणार , भारतात दाखल होण्यास तूर्तास अवकाश

आता दोन मिनटात बनवा ‘थंडगार बिअर’

उन्हाळा सुरु होताच बिअरची मागणी वाढू लागते , पण बिअरमध्ये अल्कोहोल असल्यामुळे तुम्ही ती सगळीकडे घेऊन पिऊ शकत नाही. काही वेळेस पार्सल आणल्यावर ती घरी आणल्यावर गरम होते. पण याच समस्येचे आता निराकरण झाल्याचे दिसत आहे. जर्मनीमध्ये आता बिअर पावडर मिळू लागली आहे. फक्त दोन चमचे बिअर पावडर घेऊन पाण्यामध्ये टाकून आता थंडगार बिअर तयार होऊ शकते. याबरोबरच आता हि पर्यावरणासाठी पण उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे कारण , हि बिअर पावडर बनवताना जास्त कार्बन उत्सर्जन झाले नसल्याचे दिसत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, जर्मन न्युज वेबसाईट डीडब्लू मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीप्रमाणे , पूर्व जर्मनी मध्ये बनविण्यात आलेली हि पहिलीच बिअर पावडर आहे. आत्तापर्यंत बिअर पावडर स्वरूपात बनविली गेली नसल्यचे म्हंटले आहे. ह्या वर्षाच्या शेवटाला हि बिअर पावडर बाजारात विक्रीसाठी येणार असल्याचे म्हंटले आहे. यासोबतच बाटलीबंद बिअरच्या निर्यातीत जेवढे कार्बन उत्सर्जन होते तेवढे या पावडर मध्ये नसल्यचे त्यांचे म्हणणे आहे. या बिअर बनवणाऱ्या कंपनीचे म्हणणे आहे कि, हि बिअर तुम्ही दोन मिनिटात तयार करू शकता, याशिवाय हि पावडर तुम्ही खरेदी करून ठेऊ शकता आणि तुम्हाला हव्या असणाऱ्या वेळेत हवे तशी बनवू पण शकता.

हे ही वाचा:

कर्माची फळे!! राहुल गांधींनी तो अध्यादेश फाडण्यास सांगितले नसते तर आज ते खासदार असते!

जागतिक उद्दिष्ट २०३० पण भारत २०२५ पर्यंत क्षयरोग मूक्त होणार

भारत दौऱ्यावर आलेले अजय बंगा कोरोना पॉझिटिव्ह

मुंबईकरांसाठी गुड न्यूज..बालहट्टापायी मोडीत काढलेला गारगाई-पिंजाळ पाणी पुरवठा प्रकल्प पुन्हा सुरू होणार

या पावडरचे दोन चमचे बाटलीत किंवा ग्लसमध्ये टाका आणि थंडगार हवी तशी बिअर तयार करा. दरम्यान, सध्या हि बिअर पावडर फक्त जर्मनीमध्ये उपलब्ध असून संपूर्ण जगात याचे वितरण करणार असून त्यासाठी थोडा अवधी लागणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. शिवाय जर का भारत देशामध्ये या बिअर पावडर येण्यासाठी वाट बघावी लागणार आहे कारण भारतामध्ये अजून कायदेशीर प्रक्रिया पार पाडाव्या लागणार असून भारतात हि बिअर दाखल व्हायला वेळ लागणार असल्याचे कंपमापणीचे म्हणणे आहे.

Exit mobile version