रायबरेली स्टेडियमला आता भारताची हॉकी स्टार ‘राणी रामपाल’ हिचे नाव देण्यात आले असून , “राणीज गर्ल्स हॉकी टर्फ” असे या मैदानाला ओळखले जाणार आहे. भारतीय संघाची स्टार हॉकीपटू ही या निमित्ताने हा अनोखा सन्मान करण्यात आला आहे.
मॉडर्न कोच फॅक्टरी रायबरेलीने हॉकी स्टेडियम चे नाव बदलून राणीज गर्ल्स हॉकी टर्फ असे ठेवण्यात आले आहे. राणी अशी पहिलीच महिला खेळाडू आहे जिचे नाव हे स्टेडिअमला देणार आले आहे. याबाबत राणीने तिच्या सोशल मीडियावर याबाबत फोटो शेअर करून माहिती दिली आहे. या फोटोमध्ये ती खेळाडूंशी संवाद साधताना दिसत आहे. आणि ती स्टेडिअमचे उदघाटन करत असताना सुद्धा दिसत आहे.
अब भारतीय महिला हॉकी टीम की पूर्व कप्तान बहन #रानी_रामपाल_प्रजापति के नाम पर "Rani's girls Hockey Turf" रख दिया गया है। Rani Rampal प्रजापति देश की #पहली महिला खिलाड़ी बन गई हैं, जिनके नाम पर किसी स्टेडियम का #नाम रखा गया है। #Prajapatisamaj#राष्ट्रीय_प्रजापति_महा_संगठन pic.twitter.com/xa69BqTEWG
— राष्ट्रीय प्रजापति महा संगठन (@kanaram85123128) March 22, 2023
या तिच्या सन्मानाबद्दल बोलताना राणीने तिच्या ट्विटरवर म्हंटले आहे कि, माझा आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द खूप कमी वाटतात. रायबरेली स्टेडियमचे नाव बदलून राणीज गर्ल्स हॉकी टर्फ केल्यामुळे हॉकीमधल्या माझ्या योगदानाचा सन्मान केला आहे. तसेच, माझ्या नावावर स्टेडियम असणारी मी पहिली महिला हॉकीपटू ठरल्याने हा माझ्यासाठी खूप अभिमानाचा आणि भावनिक क्षण आहे. मी हे भारतीय महिला हॉकी संघाला समर्पित करते आहे. आणि मला अशा आहे कि यामुळे महिला हॉकीच्या पुढल्या पिढीला प्रेरणा मिळेल, असेही राणी म्हणाली.
हे ही वाचा:
ओमानमधून मुसक्या आवळून झाकीर नाईकला भारतात आणणार?
‘शोभायात्रांची सुरुवात डोंबिवलीत झाली आणि मग त्याचे सगळ्यांनी अनुकरण केले’
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ठोठावला मुंबई हायकोर्टचा दरवाजा
नितीन गडकरी खंडणी धमकीप्रकरणाच्या मागे एक तरुणी
महिला हॉकी प्रो लीग २०२१-२२ मध्ये बेल्जीयम विरुद्ध शेवटचा सामना खेळल्यानंतर राणी संघात परतली होती. टोकियो ऑलिम्पिकपासून २८ वर्षीय राणी दुखापतीचा सामना करत होती. नंतर तिला कॉमनवेल्थ गेम्स २०२२ आणि विश्वचषक या संघांमधून वगळण्यात आले होते. या वर्षाच्या सुरवातीपासून दक्षिण आफ्रिका दौऱ्यात राणीने आपले भारतीय संघात पुनरागमन करून तिचा २२ सदस्यीय संघामध्ये समावेश करण्यात आला होता.