अमेरिकेत भारतीयांसाठी जॉब व्हिसा मिळणे आता सोपे झाले आहे. “आपल्या देशात हाय स्किल इमिग्रेशन सिस्टिम आहे म्हणूनच जगभरातील उत्कृष्ट आणि कुशल कामगार आणि व्यावसायिकांना इथे येण्यास मदतच होईल” असे डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते राजा कृष्णमूर्ती म्हणाले आहेत. सध्या व्हिसा कायद्यात बदल करण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत नवीन कायदा विधेयक सादर केले आहे. सध्याच्या अमेरिकेमधल्या फेडरल इमिग्रेशन कायद्यानुसार जे दरवर्षी व्यवसाय किंवा नोकरीसाठी व्हिसा मंजूर केला जातो त्याचा वापर योग्य पद्धतीने होण्यासाठी यु एस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजेच अमेरिकन संसदेच्या खालच्या सभागृहात द्विपक्षीय विधेयक मांडण्यात आले आहे.
डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते राजा कृष्णमूर्ती आणि लॅरी बुशान यांनी द्विपक्षीय विधेयक सादर केले आहे. राजा कृष्णमूर्ती पुढे म्हणाले कि, आपल्याकडे हाय स्किल इमिग्रेशन सिस्टम आहे. जगातले कुशल आणि उत्कृष्ट कर्मचारी यांना येथे येण्यास मदत होते. सध्या अमेरिकेमध्ये कर्मचाऱ्यांच्या मूळ देशाच्या आधारावर, रोजगारावर आधारित व्हिसा देण्याची संख्या हि मर्यादित स्वरूपाची आहे. अमेरिकेत नोकरीसाठीचा व्हिसा हा प्रत्येक देशाच्या व्हिसा मिळवणाऱ्याच्या संख्येवर अवलंबून असतो. म्हणूनच काही देशांना जास्त तर काही देशांना कमी व्हिसाची परवानगी देण्यात येते.
हे ही वाचा:
“गुम है किसी के प्यार में” या प्रसिद्ध मालिकेचा सेट जळून खाक
साई रिसॉर्ट वायकरांच्या पंचतारांकित प्लॅनसमोर चिल्लरच
तरुणाने शेपटाला छेडले आणि वाघ त्याच्यावर उलटला..नंतर जे झाले ते वाईट होते
…म्हणून राज ठाकरे म्हणतात सत्तेपासून आपण दूर नाही!
या नवीन कायद्याचा उद्देश हा मुख्य म्हणजे अमेरिकन अर्थव्यवस्थेला मजबूत करणे हा आहे. म्हणूनच नोकरीच्या अधिक संधी निर्माण होण्यासाठीपण याची मदत होऊ शकते. यासंदर्भात लॅरी बुशान म्हणाले कि सध्या डॉक्टर आणि इंजिनीयरसाठी फेडरल कायद्याप्रमाणे वार्षिक व्हिसा दिला जातो. या सर्वामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोलाचे योगदान होत आहे. पण वेगवेगळी धोरणे आणि विलंबामुळे देशभरात जास्तीत जास्त कुशल कामगारांची गरज असूनसुद्धा हजारो लोकांना व्हिसा मिळत नाही. म्हणूनच हे विधेयक मंजूर झाल्यास रोजगाराच्या खूप संधी उपलब्ध होणार आहेत.
दरम्यान, संपूर्ण जगातल्या कुशल कामगारांना आकर्षित करण्यासाठी व्हिसाचा वापर सुनिश्चित करणे आवश्यक असल्यामुळे या नव्याने सादर केलेल्या विधेयकात सांगण्यात आले आहे. विविध देशांप्रमाणे त्यांच्या व्हिसाच्या संख्येत सध्याची असलेली तफावत म्हणजेच हाय स्किल इमिग्रेशन सिस्टिम मधील हा भेदभाव दूर होणे गरजेचे आहे. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले तर, याचा खूप मोठा फायदा भारतीयांना होणार आहे. दरवर्षी भारतदेशामधून लाखो लोक अमेरिकन व्हिसासाठी अर्ज करत असतात.