जोकोविचने विम्बल्डन जेतेपदावर सातव्यांदा कोरलं नाव!

जोकोविचने विम्बल्डन जेतेपदावर सातव्यांदा कोरलं नाव!

Serbia's Novak Djokovic celebrates after beating Australia's Nick Kyrgios to win the final of the men's singles on day fourteen of the Wimbledon tennis championships in London, Sunday, July 10, 2022. (AP Photo/Alastair Grant)

चार ग्रँडस्लॅमपैकी एक असलेली विम्बल्डन स्पर्धा लंडनमध्ये सुरू आहे. रविवार, १० जुलै रोजी या स्पर्धेची पुरुष एकेरीची अंतिम फेरी लंडनमधील सेंटर कोर्टवर सर्बियाचा नोव्हाक जोकोविच आणि ऑस्ट्रेलियाचा निक किर्गिओसमध्ये पार पडली. यात सर्बियाच्या जोकोविचने बाजी मारत ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसचा पराभव केला. जोकोविच याचे हे सातवे विम्बल्डन जेतेपद तर २१वे ग्रँडस्लॅम ठरले आहे.

जोकोविचने निक किर्गिओसचा ४-६, ६-३, ६-४, ७-६ (७/३) असा पराभव करून आपल्या सातव्या विम्बल्डन जेतेपदावर नाव कोरले.किर्गिओस हा आपली पहिलीच ग्रँडस्लॅम अंतिम फेरी खेळत होता तरीही त्याने जोकोविचला कडवी झुंज दिली. पहिल्या सेटमध्ये निकने आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर जोकोविचने शानदार खेळ केला. त्यानंतर चौथ्या सेटमध्ये सामना टायब्रेकरमध्ये गेला. तिथे जोकोविचने ६-१ अशी आघाडी घेतली. यापूर्वी जोकोविच आणि किर्गिओस दोनवेळा समोरासमोर आले आहेत. हे दोन्ही सामने ऑस्ट्रेलियन निकने जिंकले होते.

हे ही वाचा:

‘मुख्यमंत्री असलो तरी, जनतेचा सेवक’

जोहान्सबर्गमध्ये झालेल्या गोळीबारात १४ जणांचा मृत्यू

गौतम अदानींची होणार टेलिकॉम क्षेत्रात एन्ट्री?

एलन मस्क म्हणजे तिकीट नसलेले प्रवासी; ट्विटर करार रद्द केल्यानंतर महिद्रांनी लगावला टोला  

जोकोविचचे हे २१ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद असून राफेल नदालच्या नावे २२ ग्रँडस्लॅम विजेतेपद आहेत. तर जोकोविच याने सात विम्बल्डन जेतेपद जिंकले असून रॉजर फेडरर याने आठ विम्बल्डन जेतेपद जिंकलेले आहेत.

Exit mobile version