काबुलवर तालिबानने कब्जा केल्यानंतर संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा कब्जा झाल्याचे चित्र आहे. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. उत्तर अफगाणिस्तानमध्ये तालिबानविरोधी एक फळी तयार होत आहे. या फळीचे नाव ‘नॉर्दर्न अलायन्स’ असे आहे. अहमद मसूद या अफगाण नेत्याने या फ्लॉचे नेतृत्व स्विकारले आहे. अहमद शाह मसूद या अफगाण राजकारण्याचा हा मुलगा आहे. २००१ सालापासून पहिल्यांदा ‘नॉर्दर्न अलायन्स’चा झेंडा फडकावला गेला आहे. अफगाणिस्तानच्या डोंगराळ भागातील पंचशीर भागात ‘नॉर्दर्न अलायन्स’ची स्थापना झाली आहे.
तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबानने घरोघरी जाऊन लोकांची हत्या करायला सुरवात केली आहे. शोधून शोधून पत्रकारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मारण्यासाठी तालिबानचा दहशतवादी काबूलमध्ये फिरत आहेत. कालच डीडब्ल्यू न्यूज नावाच्या एका जर्मन वृत्तवाहिनीच्या एक पत्रकाराला गंभीर इजा पोचवली तर त्या पत्रकाराच्या कुटुंबातील एका व्यक्तीची हत्याही केली. त्याव्यतिरिक्त अजून एका नातेवाईकाला गंभीर दुखापती झाली. या घटनेनंतर या पत्रकाराने जर्मनीला पलायन केले. त्याचबरोबर त्या पत्रकाराच्या कुटुंबातील व्यक्तींनीही जर्मनीत यशस्वीपणे पलायन केले आहे.
हे ही वाचा:
तालिबानकडून घरोघर जाऊन हत्याकांड सुरु
….आणि राज्यात पुन्हा उडाला बैलगाडा शर्यतीचा धुरळा
सैफ-अर्जूनच्या ‘भूत पोलिस’ चा ट्रेलर प्रदर्शित
प्रदूषणमुक्तीच्या नव्या प्रकल्पाला पालिकेची ‘मिठी’
अफगाणिस्तानमध्ये तालिबानने कब्जा केल्यानंतर तालिबानच्या अनेक अनन्वित छळांचे व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये हिंदू, शीख यांच्यासारखे अल्पसंख्यांक तसेच महिला आणि मुलांना सर्वाधिक जाच सहन करावा लागत आहे. यामुळे अफगाण महिला आपल्या मुलांना वाचवण्यासाठी काय टोकाची पावलं उचलावी लागत आहेत, हे पाहून कोणत्याही सहृदय व्यक्तीला नक्कीच वेदना होतील.