उत्तर कोरियाला धक्का

उत्तर कोरियाला धक्का

उत्तर कोरियाचे कुवैतमधील तात्पुरत्या राजदूता दक्षिण कोरियाशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या एका खासदाराने दिली आहे. उच्च पदस्थांच्या जगापासून तुटलेल्या उत्तर कोरियातून दक्षिण कोरियाकडे चालू असलेल्या पलायनातील ही आणखी एक कडी आहे.

रु ह्युन वू हे उत्तर कोरियाची कुवेत मधील दुतावास सांभाळत होते. त्यांच्या आधीचे सो चांग सिक यांना २०१७ यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावानंतर परत बोलावले गेले होते आणि रु ह्युन वू हे देशाचे कुटनैतिक संबंध पूर्वपदावर आणण्याच्या प्रयत्नात होते.

दक्षिण कोरियात २०१६ मध्ये स्थायिक होऊन, तेथे खासदार म्हणून निवड होण्यापूर्वी उत्तर कोरियाचे ब्रिटनमधील राजदूत असलेले ताय यांग हो यांनी दिलेल्या माहितीनुसार रु यांनी सप्टेंबरमध्ये दक्षिण कोरियात सामिल होण्याचा प्रयत्न केला होता.

कुवेत हा तिथे स्थायिक असलेल्या अनेक उत्तर कोरियायी कामगारांमुळे उत्तर कोरिया करिता विदेशी चलन पुरवठ्याचे मुख्य केंद्र राहिला आहे. यापैकी बरेच कामगार हे बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आहेत.

रु यांचे दक्षिण कोरियाला सामिल होणे हे दर्शवते, की हळूहळू परंतू सातत्याने किम जोंग उन यांच्यापासून उत्तर कोरियातील उच्चभ्रू वर्ग दूर जात आहे असे ताय यांनी सांगितले. यापूर्वी जो सॉंग गील हे उत्तर कोरियाचे इटलीतील राजदूत असताना वकिलातीतून एकाएकी पत्नीसह गायब होऊन मग दक्षिण कोरियात पुन्हा सापडले होते. यानंतर काहीच महिन्यांनी रू यांची घटना घडली आहे.

Exit mobile version