मथुरा आता तीर्थक्षेत्र घोषित करण्यात आल्यामुळे आता याठिकाणी दारू तसेच मांसबंदीची घोषणा झालेली आहे. मंदिरासभोवतीच्या १० किमीच्या परिसरामध्ये आता मांस विक्री आणि दारूबंदी करण्यात आलेली आहे. उत्तरप्रदेश सरकारने नुकताच हा निर्णय घेतेलेला आहे. मंदिर शहराला तीर्थक्षेत्र घोषित केल्यानंतर शनिवारी मथुरामध्ये मांस पुरवणारी रेस्टॉरंट्स बंद झाली.
मथुरा शहराला मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांनी शुक्रवारी तीर्थक्षेत्र घोषित केल्यानंतर, त्याच दिवशी मांस आणि दारू विक्रीवरील बंदी लागू करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सक्रिय झाली. बहुतेक मांसाची दुकाने तसेच मांसाहारी जेवण देणारी रेस्टॉरंट्स शनिवारपर्यंत बंद करण्यात आली होती. स्थलांतरित होणाऱ्या दारूच्या दुकानांची यादी तयार केली जात होती. आता महापालिका क्षेत्र (मथुराचे २२ नगरपालिका वॉर्ड) मध्ये दारू आणि मांस विक्री बंदीच्या अंमलबजावणीसाठी काम करणार आहे, अशी माहिती लखनौमधील एका वरिष्ठ अधिकारी याने दिली.
नांदगाव आणि बरसाना सारखी गावे आधीच तीर्थस्थळे होती. आता या क्षेत्राचा विस्तारही चांगलाच झालेला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या परवानाधारक दारू दुकाने विभाग स्थलांतरित करेल. त्यांनी परवाना शुल्क वगैरे भरले आहे, त्यामुळे त्यांना तीर्थ स्थळाच्या मर्यादेबाहेर स्थलांतरित केले जाईल, अशी माहिती संजय आर भूसरेड्डी, अतिरिक्त मुख्य सचिव, उत्पादन शुल्क विभाग, यूपी सरकार यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानमध्ये कलाक्षेत्रावर अवकळा!
बुरख्यातील महिलांना पसंत आहे तालिबानी कायदा
पंतप्रधान आमच्याशी आपुलकीने बोलतात, याचे परदेशी खेळाडूंना कौतुक वाटते!
आणखीन एका बलात्काराच्या घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला…नराधम अटकेत
सरकारी अधिसूचनेबद्दल चर्चा करण्यासाठी मांसविक्रेत्यांनी शनिवारी बैठक घेतली होती. यापूर्वी २०१७ सालीही उत्तर प्रदेश सरकारने मांसविक्रीवर बंदी लागू करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ते काही पूर्णत्वास आले नव्हते.