27 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरदेश दुनियाटाटा सन्सच्या बोर्डासाठी नोएल टाटांचे नाव?

टाटा सन्सच्या बोर्डासाठी नोएल टाटांचे नाव?

Google News Follow

Related

रतन टाटा यांचे सावत्र बंधू स्वीकारतील जबाबदारी

वेस्टसाईड, क्रोमा, स्टार बझार, स्टार बक्स अशा एकापेक्षा एक दिग्गज आणि नफ्यातल्या कंपन्यांच्या विपणन म्हणजेच मार्केटिंगची जबाबदारी आपल्या खांद्यावर वाहणारे नोएल टाटा सध्या चर्चेत आहेत. कारण आहे ते, लवकरच ते टाटा सन्सच्या संचालक बोर्डावर जाणार आहेत. ६३ वर्षीय नोएल टाटा ही जबाबदारी येत्या काळात स्वीकारणार असल्यामुळे स्वाभाविकच नोएल यांच्याविषयीचे कुतुहल प्रत्येकाच्या मनात जागृत होत आहे. कोण आहेत नोएल टाटा, त्यांच्यावर ही नवी जबाबदारी का सोपविण्यात येणार आहे, त्यांची ही आतापर्यंतची वाटचाल कशी झाली, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे कुणालाही हवीहवीशी असतील.

टाटा समूह म्हटल्यानंतर जे नाव आपल्याला सुपरिचित आहे ते म्हणजे रतन टाटा. याच रतन टाटा यांचे नोएल हे सावत्र भाऊ. टाटा सन्सचे माजी चेअरमन म्हणून पायऊतार झालेले रतन टाटा ख्यातनाम उद्योगपती म्हणून सर्वांनाच ठाऊक आहेत. त्यांच्या बाणेदारपणाबद्दलही आपण ऐकलेले आहे. याच रतन टाटा यांच्याशी नोएल यांचे रक्ताचे नाते आहे. अर्थात, सावत्र भाऊ म्हणून. त्यामुळेच त्यांच्या या कौटुंबिक नातेसंबंधांवर प्रकाश टाकूया.

हे ही वाचा:

नाल्यातला गाळ काढण्याऐवजी महापालिकेने करातून माल काढला

ठाकरे सरकारची निष्क्रियता; अस्मिता योजनेचा उडाला बोजवारा

मराठा मोर्चापूर्वी १५ जूनला ओबीसी मोर्चा

मराठा मोर्चापूर्वी १५ जूनला ओबीसी मोर्चा

रतन टाटा यांचे वडील नवल टाटा. नवाजबाई आणि सर होमी टाटा यांनी नवल यांना दत्तक घेतले होते. मोठे झाल्यानंतर नवल यांनी सिलू यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुलगे झाले. त्यातील लहान मुलाचे नाव जिमी तर मोठ्याचे नाव रतन. हेच ते रतन टाटा. काही कालावधीनंतर नवल आणि सिलू यांनी घटस्फोट घेतला. दहा वर्षांनी नवल यांनी स्वीत्झर्लंडच्या सिमॉनशी विवाह केला. सिमॉन भारतात असताना त्यांची नवल यांच्याशी भेट झाली आणि त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. याच दोघांचे सुपुत्र म्हणजे नोएल. त्यामुळे रतन टाटा आणि नोएल टाटा हे सावत्र भाऊ.

नोएल टाटा यांचे नाव रतन टाटा यांच्याप्रमाणे फारसे चर्चेत नसते. पण टाटांच्या विविध कंपन्यांत ते जबाबदारीच्या जागेवर आहेत. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे ते चेअरमन आहेत. टायटन इंडस्ट्रीजचे ते व्हाइस चेअरमन आहेत. टाटा इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक आणि वेस्टसाईडची मालकी असलेल्या ट्रेन्टचेही ते चेअरमन आहेत.
ससेक्स विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या नोएल यांनी फ्रान्समधील प्रतिष्ठेच्या बिझनेस विद्यापीठात शिक्षण घेतलेले आहेत. टाटा इंटरनॅशनलमध्ये त्यांच्या व्यावसायिक कारकीर्दीला प्रारंभ झाला. टाटा उद्योगसमुहाच्या आंतरराष्ट्रीय उद्योगांची जबाबदारी टाटा इंटरनॅशनलवर असते.

नव्या शतकाच्या प्रारंभी नोएल यांनी ट्रेन्टची जबाबदारी स्वीकारली. या कंपनीची स्थापना नोएल यांची आई सिमॉन यांनी केली होती. वेस्टसाईड या वस्त्रप्रावरणांच्या क्षेत्रातील कंपनीची मुख्य कंपनी म्हणजे ट्रेन्ट. त्यांनी २००३मध्ये ट्रेन्टला मोठा नफा मिळवून दिला आणि नंतर त्यांनी टायटन आणि व्होल्टास या कंपन्यांचे संचालक म्हणून जबाबदारी स्वीकारली.
२०१०मध्ये ते टाटा इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक झाले. याच कंपनीतून त्यांच्या कारकीर्दीला प्रारंभ झाला होता. त्याचवेळी रतन टाटा हे निवृत्तीच्या जवळ पोहोचले होते. तेव्हा नोएल यांच्याकडे ही सूत्रे येणार अशी शक्यता होती. पण नोएल यांची पत्नी आलू मिस्त्री यांचा भाऊ अर्थात नोएल यांचा मेहुणा सायरस मिस्त्री यांच्याकडे ही जबाबदारी आली. सायरस यांचे वडील पालनजी मिस्त्री हे टाटा सन्समधील सर्वाधिक शेअर्स असलेले उद्योगपती.

पाच वर्षांत सायरस मिस्त्री हे टाटा सन्सचे चेअरमन म्हणून बाहेर पडले आणि नटराजन चंद्रशेखरन यांच्याकडे ती जबाबदारी आली. त्याच दरम्यान नोएल हे टायटनचे व्हाइस चेअरमन झाले. आता टाटा सन्सच्या बोर्डावर नोएल यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. नोएल यांच्यासह प्रमित झवेरी यांचे नाव शर्यतीत आहे. पण ते फायनान्समधील तज्ज्ञ आहेत. या बोर्डावर सौरभ अगरवाल हे फायनान्स क्षेत्रातील अग्रणी आधीच असल्यामुळे झवेरी यांच्याऐवजी मार्केटिंगमधील नोएल यांच्यावरच विश्वास दाखविला जाईल अशी शक्यता आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा