लसीची निर्यात भारतीयांच्या जीवाचा विचार करूनच

लसीची निर्यात भारतीयांच्या जीवाचा विचार करूनच

आदर पुनावाला यांची स्पष्टोक्ती

जगात इतर देशांना लसीच्या निर्यातीचे समर्थन करताना सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे अध्यक्ष आदर पुनावाला यांनी स्पष्ट केले की, लसींच्या निर्यातीचा निर्णय अनेक घटकांवर अवलंबून होता. जानेवारी महिन्यात भारतात सर्वात कमी रुग्णवाढ होत होती, त्यासोबत आपापसातील सामंजस्य सहकारामुळे लस निर्यात करावी लागली होती. मात्र लसींची निर्यात ही भारतीयांच्या जीवाचा विचार करूनच करण्यात आली होती. भारतीयांच्या जीवाची किंमत देऊन लस निर्यात केली गेली नाही.

सिरम इन्स्टिट्युटने काढलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की,

आम्ही पुन्हा एकदा हे स्पष्ट करू इच्छितो की आम्ही कधीही भारतीयांच्या जीवाशी खेळून लसींची निर्यात केलेली नाही आणि देशांतर्गत लसीकरण मोहिमेला सशक्त करण्यासाठी आम्ही जे काही करू शकतो ते करण्यासाठी वचनबद्ध आहोत.

देशांतर्गत लसींच्या तुटवड्यामुळे सिरम इन्स्टिट्युटवर अनेक देशांना लस निर्यात केल्यामुळे हा तुटवडा निर्माण झाला असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणुचा प्रभाव भारतात पुन्हा एकदा वाढत असताना भारतीयांसाठीच लस उपलब्ध नसल्याचा अपप्रचार सातत्याने केला गेला.

हे ही वाचा:

‘लस- पर्यटनात’ भारतीयांची रशियाला पसंती

मराठा आरक्षण: भाजपा नेत्यांनी पंतप्रधानांना भेटून बाजू मांडावी

काँग्रेस गिधाडांप्रमाणे प्रेतांवर नजर ठेवून आहे

कोरोनाला ‘इंडियन व्हायरस’ म्हणत चीनी देणग्यांची परतफेड

या वर्षाच्या अखेरपासून कोवॅक्समधील आपले वचन पूर्ण करण्यासाठी आणि इतर देशांना दिलेली वचने देखील पूर्ण करण्यासाठी लस देशाबाहेर पाठवण्याचे नियोजन करत आहे.

देशादेशांमधील सहकार्यामुळेच आपल्याला वैद्यकीय तंत्रज्ञान आणि मदत मिळण्याचा पाया रचला गेला आहे.

असे देखील कंपनीने त्यांच्या पत्रकात म्हटले आहे.

आज भारताला मिळणारी मदत ही या सहकार्याचे आणि भारताने जपलेल्या मैत्रीचेच प्रतिक आहे. भारतात जेव्हा रुग्णसंख्या कमी होती, त्यावेळी भारताने अनेक देशांना सहाय्य केले होते. त्यामुळेच आता भारताला गरज असताना जगातील अनेक देशांनी देखील भारताला सहाय्य केले आहे.

Exit mobile version