बायडन सरकारमध्येही आता भारत विरोधकांना थारा नाही?

बायडन सरकारमध्येही आता भारत विरोधकांना थारा नाही?

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन यांनी व्हाईट हाऊसच्या बजेट सल्लागार पदी भारतीय वंशाच्या नीरा टंडन यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु मंगळवारी, विरोधकांच्या प्रतिकारानंतर बायडन यांनी टंडन यांचे नाव मागे घेतले आहे.

अमेरिकेमध्ये अनेक भारतविरोधी शक्ती काम करत आहेत. पॉपस्टार रिहाना आणि पॉर्नस्टार मिया खलिफा यांनी शेतकरी आंदोलनाच्या विषयावर केलेली ट्विट्स आणि ग्रेटा थंबर्गने शेअर केलेले टूलकिट या उदाहरणांमधून हे स्पष्टपणे दिसून येतच. परंतु याशिवाय या तथाकथित, पर्यावरणप्रेमी आणि मानवाधिकार कार्यकर्ते यांचे बोलविते धनी वेगळेच असतात. अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्ष, ज्या पक्षाचे जो बायडन हे आज राष्ट्रपती आहेत, त्या पक्षात अनेक डाव्या विचारांचे नेते आहेत. हे नेते त्यांच्या विचारधारेमुळे भारताचा विरोध करत असतात. यामध्ये प्रसिद्ध नावं म्हणजे, अलेक्सान्ड्रिया ओकासियो कॉर्टेझ, (एओसी) इलहान ओमार, रो खन्ना आणि नीरा टंडन.

हे ही वाचा:

‘समाजसेविका’ मिया खलिफा शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात

या सर्व नेत्यांनी भारताच्या अनेक अंतर्गत मुद्द्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर विरोध केला होता. यामध्ये काश्मीरमधील कलाम ३७० काढणे, सीएए, एनआरसी या मुद्यांचा समावेश आहे. शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावरही या सर्व नेत्यांनी भारतविरोधी ‘प्रॉपगॅन्डा’ पसरवला होता.

यामुळे नीरा टंडन यांच्या नियुक्तीमुळे भारतातही चिंता व्यक्त केली जात होती. परंतु आता बायडन यांनी देखील त्यांचे नाव मागे घेतले आहे.

Exit mobile version