चीनने नव वर्षाच्या सुरुवातीला गलवानमध्ये ध्वजारोहण केल्याचा एक व्हिडीओ जारी केला होता. या व्हिडीओवरून भारतात अनेकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलायची उबळ आली होती. मात्र, काही दिवसांमध्येच ‘टाइम्स नाऊ’ने हा व्हिडीओ चीनच्याच भूमीत असल्याचे समोर आणले होते. याच व्हिडीओबद्दल आता नवा खुलासा समोर आला आहे.
चीनने शेअर केलेला हा व्हिडीओ चिनी सैनिकांचा नव्हे, तर चित्रपट कलाकारांचा वापर करून चित्रीकरण करण्यात आल्याचे समोर आला आहे. ‘कार्बन ट्रेसी’ या आंतरराष्ट्रीय वेब पोर्टलने हा दावा केला असून या संबंधीचे वृत्त ‘नवभारत टाइम्स’ने दिले आहे. या व्हिडीओचे चित्रीकरण हे गलवानपासून मागे सुमारे २८ किमी अंतरावर असलेल्या अक्साई चीन परिसरात करण्यात आले होते.
हे ही वाचा:
आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी
… म्हणून सोनू सूदने पंजाबचे ‘स्टेट आयकॉन’पद सोडले
झुलन गोस्वामीच्या मुख्य भूमिकेत विराटची बायको!
भारतीयांना लवकरच ई-पासपोर्टची सेवा
या व्हिडीओ मध्ये दिसणारा एका सैनिक हा चित्रपट कलाकार वू झांग आहे, असा दावाही करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्याची पत्नी शी नान देखील सहभागी होती. तसेच हे चित्रीकरण करायला चार तासांचा कालावधी लागल्याचे सांगण्यात येत आहे. वू झांग हा चिनी चित्रपटातील प्रसिद्ध कलाकार असून त्याने अनेक चीनी चित्रपटांमध्ये पीएलए सैनिकाची भूमिका साकारली आहे. अनेक चिनी नागरिकांनी या व्हिडीओवर प्रश्न उपस्थित केल्यावर या पोर्टलने हा दावा केला आहे.