रविवारपासून इस्रायल ‘मास्क फ्री’

रविवारपासून इस्रायल ‘मास्क फ्री’

खुल्या जागेत मास्क घालण्याची आता गरज नाही

करोना संसर्ग पुरेशा प्रमाणात आटोक्यात आल्यामुळे इस्रायल आता रविवारपासून मास्कमुक्त होणार आहे. अर्थात, बंदिस्त जागी मास्क घालणे अनिवार्य असेल. पण खुल्या जागेत मास्कपासून नागरिकांना मुक्ती मिळणार आहे. इस्रायलमध्ये यशस्वी लसीकरण झाल्यामुळे करोना बाधितांची संख्या खूप खाली आल्यानंतर मास्कचे निर्बंध शिथिल झाले आहेत, असे आरोग्यमंत्री युली एडलस्टाइन यांनी म्हटले आहे. ९३ लाख लोकसंख्येपैकी जवळपास ५० लाख लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण झाल्यामुळे इस्रायलमधील करोना संसर्ग खाली आला आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्या प्रयत्नामुळे इस्रायलला फायझर लसीचा पुरवठा मोठ्या प्रमाणात झाला. या लसीमुळे इस्रायलमधील जीवन बदलून गेले आहे. जानेवारीच्या मध्यात इस्रायलमध्ये बाधितांची संख्या १० हजारच्या घरात होती. पण आता दरदिवशी केवळ २०० बाधितांपर्यंत ही संख्या घसरली आहे. शिवाय, उपाहारगृहे, बार, सोहळे यावरील निर्बंध शिथिल केल्यानंतरही यात वाढ होताना दिसत नाही.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांनी ‘माझे राज्य, माझी जबाबदारी’ म्हणत कर्तव्यपूर्ती करावी

कोरोना लसीवर असलेली बौद्धिक संपदेची कलमे शिथिल करा

बंगालमध्ये हिंसाचाराच्या तुरळक घटना

मलिकांची ट्विट्स म्हणजे अर्धसत्य आणि असत्य

बुधवारी झालेल्या इस्रायलच्या ७३व्या स्वातंत्र्यदिनी फायझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोर्ला हे प्रमुख अतिथी होते. लोकांचे यशस्वी लसीकरण झाल्यामुळे करोना संकटावर मात करता आली, असे बोर्ला यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, विविध सामाजिक संघटनांनी इस्रायलमध्ये असलेल्या ४८ लाख पॅलिस्टिनी जनतेलाही लसीचा पुरवठा करावा अशी मागणी केल्यानंतर पॅलिस्टिनी लोकांनी स्वतःच हे लसीकरण करून घ्यावे, असे इस्रायलने म्हटले आहे.

Exit mobile version