पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांची सुटका केली आहे. या दरम्यान पाकिस्तानच्या मंत्री मरियम औरंगजेब यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ‘पाकिस्तान जळतोय. जर उद्या न्यायाधीशांच्या घरात घुसून कोणी आग लावेल, तेव्हा त्याचा निर्णय तुम्ही घ्या. कोणाचेच घर वाचणार नाही,’ अशी धमकी दिली.
सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान इमरान खान यांची अटक बेकायदा असल्याचे सांगत त्यांची सुटका केली. तसेच, या प्रकरणी पुन्हा सुनावणी घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाला दिले. सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांना घरी पाठविण्याची विनंती फेटाळून लावली असून त्यांना पोलिस लाइनमध्येच थांबण्याचे निर्देश दिले आहेत. एका बाजूला सर्वोच्च न्यायालयात इम्रान यांच्या अर्जावर सुनावणी सुरू असतानाच पाकिस्तानच्या माहिती व प्रसारण मंत्री मरियम औरंगजेब पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना धमकी देत होत्या.
‘पाकिस्तान जळतोय. उद्या जर न्यायाधीशांच्या घरी घुसून कोणा व्यक्तीने आग लावली तर? तेव्हा तुम्ही निर्णय घ्या. कोणाचेच घर वाचणार नाही. सत्ताधाऱ्यांच्या घरांना लक्ष्य केले गेले. गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांचे घर पेटवून देण्यात आले. याकडे लक्ष का नाही दिले गेले? ती तुमची माणसे नव्हती का? रुग्णवाहिका जळली, मशिदी जळल्या, शाळा जाळली, ते या देशाचे नव्हते का? रेडिओ पाकिस्तान देशाचा नव्हता का?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
‘भ्रष्टाचाराचा आरोप असणाऱ्या इम्रान खान यांनी देशात दहशत माजवली आहे. ६० अब्ज रुपयांच्या भ्रष्टाचारावर उत्तर द्यायचे आहे. जो पैसा सर्वोच्च न्यायालयाकडे जमा झाला. या पैशांचा ट्रस्ट बनवून इम्रान खान विश्वस्त बनले. त्या तिजोरीत या देशाचे ६० अब्ज रुपये जमा झाले आहेत. जर तुम्ही दहशतवाद्यांना संरक्षण दिले तर त्यांना न्यायालयाकडूनच अटक होईल. जेव्हा पोलिस न्यायालयाचा आदेश घेऊन गेले होते, तेव्हा त्यांचे डोके फोडण्यात आले होते. तेव्हा शिक्षा का दिली नाही? तेव्हा तुम्ही तुमच्या लाडक्याला शिक्षा का दिली नाही? तेव्हा शिक्षा दिली असती तर आता देश जळत नसता,’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हे ही वाचा:
इम्रान खान यांना दिलासा, पण भविष्य अंध:कारमय
“सुषमा अंधारेंनी शरद पवारांऐवजी ठाकरेंसमोर रडावं”
वाढताहेत उन्हाच्या झळा, मुंबईकरांनो पुढील दोन दिवस तब्येत सांभाळा!
“नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला ही चूक”
मरियम यांनी भारताचे उदाहरणही दिले. ‘तुम्ही भारतातील प्रसारमाध्यमे पाहा. जे कट्टर शत्रूने ७५ वर्षांत केले नाही ते इम्रान खान यांनी करून दाखवले आणि त्याला न्यायालय आज दिलासा देईल. तेव्हा हा देश कुठे जाईल? या देशाला कोण वाचवेल,’ असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.