29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरदेश दुनियाइंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटिशीच्या यादीतून मेहुल चोक्सी गायब!

इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटिशीच्या यादीतून मेहुल चोक्सी गायब!

इंटरपोलकडून स्पष्टीकरण नाही, सीबीआयला हा धक्का असल्याचे मानले जात आहे

Google News Follow

Related

आर्थिक घोटाळ्यात अडकलेला मेहुल चोक्सी याच्यावर इंटरपोलने लागू केलेली रेड कॉर्नर नोटीस मागे घेतली आहे असे कळते. इंटरपोलच्या वेबसाईटवर ७०२३ गुन्हेगारांत मेहुल चोक्सीचे नाव समाविष्ट नसल्याचे दिसते आहे. त्यामुळे मेहुल चोक्सी आता जगभरात विविध ठिकाणी प्रवास करू शकेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

चोक्सीने केलेल्या याचिकेनंतर त्याच्यावरील रेड कॉर्नर नोटीस मागे घेण्यात आली आहे, असे समजते. मात्र इंटरपोलने याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

चार वर्षांपूर्वी चोक्सीविरोधात ही रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. मात्र आता त्या यादीतून त्याला काढून टाकण्यात आल्यामुळे त्याच्यासंदर्भात तपास करणाऱ्या सीबीआयला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

काय आहे रेड कॉर्नर नोटीस

एखाद्या गुन्हेगाराला जगभरात शोधणे आणि त्याला अटक करण्यासाठी ही नोटीस जारी केली जाते. अर्थात, त्याचा अर्थ त्याला त्याच्या मूळ देशाकडे सुपूर्द करण्याची तरतूद यात नाही. म्हणजेच रेड कॉर्नर नोटीस हा कोणताही अटक वॉरंट नाही. इंटरपोलचे सदस्य असलेले देश आपल्याकडील गुन्हेगाराला अटक करण्यासाठी इंटरपोलकडे अर्ज करतात. त्या देशाकडून जी माहिती दिली जाईल त्यानुसार ही नोटीस नियमितपणे अपडेट केली जाते. मात्र आता या वेबसाईटवर चोक्सीचे नाव दिसत नाही. ७०२३ जणांना सध्या ही नोटीस जारी करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

राज्यात अखेर गो आयोगाची स्थापना

‘खलिस्तानी चळवळीला लंडनमधील शीख समुदायाने नाकारले आहे!’

नेरुळ येथे बांधकाम व्यावसायिकाला गोळ्या घालणारे सापडले बिहारमध्ये

रवींद्र वायकर सुद्धा ठाकरेंना सोडून चालले का?

मेहुल चोक्सीविरोधाता आता रेड कॉर्नर नोटीस नसल्यामुळे भारतातील विरोधकांना आयते कोलित मिळाले आहे. त्यांनी यावर टीका केली आहे. काँग्रेसचे जयराम रमेश, आम आदमी पार्टी यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे.

मेहुल चोक्सीवर पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्याचे आरोप आहेत. त्याच्या कंपन्यांना कर्ज मिळविण्यासाठी त्याने खोटी कागदपत्रे सादर केली आणि त्यासाठी बँकेच्या काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरले असा आरोप आहे. त्याला कर्ज देताना पंजाब नॅशनल बँकेने कोणतेही तारण ठेवले नाही असेही स्पष्ट झाले आहे. २०११पासून ही प्रक्रिया सुरू होती. सध्या मेहुल चोक्सी हा वेस्ट इंडिजमधील अँटिगा येथे आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा