32 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरअर्थजगत.... इराणमधून येणारी किवी भारतात का नको?

…. इराणमधून येणारी किवी भारतात का नको?

Google News Follow

Related

भारताने आता इराणमधून येणाऱ्या ताज्या किवी फळांची आयात स्थगित केली आहे.

कारण भारतात मध्य पूर्वेच्या देशांकडून येणाऱ्या फळांवर कीटकनाशकांची फवारणी केलेली असते. इतकेच नाही तर तेथील फळंसुद्धा कीटकग्रस्त असतात. त्यासाठी भारताने संबंधीत देशांना वारंवार इशारा देऊनही काही फरक न पडल्याने आता आयातच स्थगित केली. असे केंद्रीय कृषी मंत्रालयाने सांगितले.

भारताने ठरवून दिलेल्या गुणवत्तेच्या निकषांचे पालन होत नसल्याने भारताने कारवाई करण्याची वारंवार इशारा देऊनही इराणमधून किवी फळांच्या कीटकग्रस्त खेपांमध्ये वाढ झाली आहे. याआधी २०१९ मध्येही भारताने इराणमधून आलेल्या किवी फळांच्या १३ खेपांमधून ‘एस्पिडियोटस नेटिल’ नावाचे कीटक आणि कीड याबाबात इशारा दिली होती. या कीटकग्रस्त किवी फळांच्या पुरवठ्याबाबत सतत इराणला सांगण्यात आले होते. तसेच फळांची योग्य ती तपासणी करण्याचेही सांगण्यात आले होते. पण इराणकडून मात्र कोणतीही कारवाई घेतली गेली नाही. असे या पत्रात नमूद केले आहे. या कीटकांमुळे भारताच्या जैवसुरक्षेला धोका आहे, त्यामुळे भारतीय नियमांच्या तरतुदींनुसार त्यावर कारवाई केली जात आहे.

इराणच्या ताज्या किवी फळांच्या आयातीवर कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत नोडल बॉडी नॅशनल प्लांट प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन (NPPO) ने ७ डिसेंबरपासून बंदी घातली आहे. इराणद्वारे ताज्या किवी फळांसाठी ८ डिसेंबर, २०२१ पासून जारी केलेली फायटोसॅनिटरी प्रमाणपत्रे आमच्याकडून स्वीकारली जाणार नाहीत. असे मंत्रालयाने एनपीपीओमधील आपल्या इराणी समकक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. भारताला इराणमधून येणाऱ्या फळांमध्ये कीटक ‘एस्पिडियोटस नेटिल’ आणि दोन किवी फळांच्या मालामध्ये ‘स्यूडोकोक्कू कॅलसेओलारिया’ कीटकनाशके आढळली. इराणमधून भारतात ऑक्‍टोबर २०२१ पासून आलेल्या आतापर्यंतच्या फळांच्या कंटेनरमधील २२ कंटेनरमध्ये ‘ स्यूडोकोक्कू कॅलसेओलारिया ‘ आढळल्याचे भारताने आपल्या पत्रात म्हटले आहे

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा