अफगाणिस्तानचा ताबा तालिबान्यांनी घेतल्यानंतर आता तिथले एकूणच सर्व वातावरण बदलू लागलेले आहे. तालिबानने महिलांसाठी स्पष्ट केले आहे की ते बुरखा किंवा हिजाब यापैकी एक निवडू शकतात.
केवळ बुरखा किंवा हिजाब घालण्याची सक्ती करण्यात आल्यामुळे तालिबानमध्ये अचानक बुरख्यांच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. त्याचबरोबर आता पुरुषांसाठीही ड्रेस कोड तयार केला जात आहे. यात हे देखील स्पष्ट आहे की पाश्चिमात्य देशांची फॅशन आता अफगाणिस्तानात चालणार नाही. जीन्स घालणे हे इस्लामविरोधी आहे असे म्हणत, बंदुकीचा धाक दाखवून स्त्रियांना मारणे सुरुच आहे. गेल्या २० वर्षामध्ये अफगाणिस्तान बदलला, तिथल्या मुलींचे राहणीमान देखील बदलले. परंतु आता तालिबान राजवटीमुळे पुन्हा एकदा स्त्री पुरुषांच्या स्वातंत्र्यावर गदा आलेली आहे.
तालिबान्यांनी काही तरुणांना पकडून मारहाण केल्याचे सध्या दिसून आले आहे. त्यांचा एकच दोष होता की त्यांनी जीन्स घातली होती. वास्तविक, काही तरुण काबूलमध्ये एकत्र फिरायला गेले होते. जीन्स घातलेल्या या तरुणांना तालिबानी दहशतवाद्यांनी घेरले आणि त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या दरम्यान, काही युवक संधी मिळाल्यानंतर पळून जाण्यात यशस्वी झाले, तर काही जण ते करू शकले नाहीत. त्यामुळेच आता पुरूषांनी कोणते कपडे घालावे यावरही आता तालिबान्यांकडून विचार करण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
मला गांजाची शेती करू द्या!; शेतकऱ्याची आर्त मागणी
कोणत्या महापालिका निवडणूका एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने लढल्या जाणार?
निराधार मुलांना ‘स्वनाथ’चा आधार
कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातच टोमॅटोचा चिखल
काबूलच्या रस्त्यावर तालिबानने टोलो न्यूजच्या पत्रकाराला मारहाण केली, दहशतवाद्यांचा खरा चेहरा समोर आला. जीन्स घातल्याबद्दल तालिबान्यांनी त्याला खूप मारले. दहशतवाद्यांनी जीन्स इस्लामचा अपमान करतात असे आता म्हटले आहे. तालिबान्यांनी मारहाण केलेल्या तरुणांने सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली आहे. मुख्य बाब म्हणजे, तालिबान्यांनी अशा प्रकारे कोणाला मारहाण करण्याची ही पहिली वेळ नाही.