भारतीय मार्केटवर हिंडेनबर्ग अहवालाचा परिणाम ‘फुस्स’

अदानी उद्योगाला झालेले नुकसान नगण्य, तज्ञांचा दावा

भारतीय मार्केटवर हिंडेनबर्ग अहवालाचा परिणाम ‘फुस्स’

पुन्हा एकदा हिंडेनबर्गने अदानी उद्योगसमूहाला लक्ष्य करताना सेबीच्या प्रमुखांवर आरोप केले. त्याचे गंभीर परिमाण होतील असा अंदाज होता, पण प्रत्यक्षात भारतीय शेअर मार्केटवर त्याचा कोणताही मोठा विपरीत परिणाम झाला नाही.

हिंडेनबर्गने यावेळी थेट अदानी उद्योगसमूहावर आरोप केलेले नसले तरी त्यांना अडचणीत आणण्यासाठी सेबी या शेअर मार्केटवर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्थेच्या प्रमुख माधवी बुच याना लक्ष्य केले. बुच यांनी अदानी यांच्या ऑफशोर निधीमध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि त्यामुळे मागे अदानी यांच्यावर जे आरोप केले त्यावर सेबी कारवाई करत नाही, असा आरोप या अहवालात करण्यात आला. पण तो आरोप सेबी, अदानी यांनी फेटाळून लावला.

अर्थात या अहवलामुळे अदानी समूहाचे १३.४ अब्ज डॉलरचे नुकसान झाले. पण भारतीय शेअर मार्केटवर त्याचा अगदी मामुली परिणाम जाणवला. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज सोमवारी ३७५ अंक खाली होता सुरुवातीला पण नंतर त्यात चांगली सुधारणा झाली आणि दिवसअखेर त्यात ५७ अंशाची घट होती. निफ्टी 50 ला देखील केवळ २०.५० अंकाचा फटका बसला.

असित मेहता इन्व्हेस्टमेंट्स इंटर्मिजीएटचे ऋषिकेश येडवे म्हणाले की, हिंडेनबर्ग अहवालामुळे असलेल्या अनिश्चीततेमुळे निर्देशांकात प्रारंभी घसरण होती. पण नंतर मार्केट सावरले आणि मोठा फटका बसला नाही.

हे ही वाचा:

बंगालच्या सीमेवर बांगलादेशी तस्करांचा बीएसएफ जवानांवर हल्ला, कारवाईत एक ठार !

ठाकरेंचे लोणचे घालण्याची प्रक्रिया सुरू!

महाराष्ट्राच्या विकासासाठी थिंक टॅंक म्हणून ‘मित्र’ कार्यरत

उत्तर प्रदेशात महाविद्यालयात अचानक हिजाब घालून शिरल्या मुली, पालक घाबरले!

केजरीवाल रिसर्चचे अरुण केजरीवाल म्हणाले की, गुंतवणूकदार आणि वित्त संस्थाना आता या प्रकारच्या आरोपांची सवय झालेली आहे. हा सेबीवर करण्यात आलेला वैयक्तिक हल्ला आहे हेदेखील ते जाणून होते. त्यामुळे या आरोपांकडे फारसे लक्ष दिले गेले नाही.

ते म्हणाले की, गेल्या वेळेस अदानी समूहाचे जे नुकसान झाले त्या तुलनेत यंदा झालेले नुकसान नगण्य होते. यावेळी अदानी इंटरप्रायझेस, अदानी पोर्टस, अदानी पॉवर, अदानी एनर्जी सोल्युशन, अदानी टोटल गॅस, अदानी विलमर, एनडीटीव्ही, एसीसी याना फटका बसला पण तो चिंताजनक अजिबात नव्हता.

Exit mobile version