25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनियाअफगाणिस्तानात आता हिजाब व्यवस्थित न घातल्यास महिलांना उद्यानबंदी

अफगाणिस्तानात आता हिजाब व्यवस्थित न घातल्यास महिलांना उद्यानबंदी

राष्ट्रीय उद्यानात जाताना महिलांनी नियमांचे योग्य पालन न केल्याचे दिसले

Google News Follow

Related

अफगाणिस्तानच्या सर्वांत लोकप्रिय राष्ट्रीय उद्यानापैकी एक असलेल्या उद्यानामध्ये प्रवेश करण्यापासून महिलांना रोखण्याचा अधिकार तालिबान सुरक्षा अधिकाऱ्यांना मिळणार आहे. महिला कपडे घालण्याची योग्य पद्धत पाळत नसल्याने हे पाऊल उचलले जात असल्याची माहिती देशाच्या नैतिक मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली.

 

मध्य बामियान प्रांतातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या बंद-ए-अमीरला जाताना महिलांनी हिजाब नीट परिधान केला नसल्याचा मंत्रालयाचा आरोप आहे. मंत्री मोहम्मद खालिद हनाफी यांनी या प्रांताला भेट दिल्यानंतर त्यांना महिलांनी हिजाब घालण्याच्या योग्य पद्धतीचे पालन केले नाही, असे आढळले आहे. त्यामुळे सुरक्षा कर्मचार्‍यांना महिलांना पर्यटनाच्या ठिकाणी भेट देण्यापासून रोखण्यास सांगावे, असे आदेश त्यांनी अधिकारी आणि धर्मगुरूंना दिले आहेत.

हे ही वाचा:

चेंबूरच्‍या शरद नारायण आचार्य उद्यानात बहरणार ‘नागरी वन’

सर्वेक्षणाच्या निकालामुळे राजस्थानातील काँग्रेसच्या गोटात चिंता

दुष्काळग्रस्त भागांना पाणी पुरविणाऱ्या प्रकल्पांना केंद्राने मदत करावी

फडणवीस यांच्यावरील खालच्या भाषेतील टीका खपवून घेणार नाही

 

एक आठवड्यापूर्वी त्यांनी हे आदेश दिले होते. त्यानंतर आता या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे. ‘महिलांनी प्रेक्षणीय स्थळी जाण्याची काही गरज नाही,’ असे विधान मंत्रालयाचे प्रवक्ते मोल व्ही मोहम्मद सादिक अकिफ यांनी केले. त्यांनी शनिवारी हनाफी यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावी, अशा सूचना सुरक्षा दल, मौलवींना दिल्या आहेत. मात्र मानवी हक्क संघटनेच्या महिला हक्कांसाठी लढणाऱ्या विभागाच्या संचालक हिदर बार यांनी या आदेशाचा निषेध केला आहे. ‘मुली आणि महिलांना शिक्षण, रोजगार आणि मुक्त हालचालीपासून वंचित ठेवल्याने काहीही साध्य होणार नाही. आता तर तालिबानत्यांच्याकडून उद्याने, खेळ आणि निसर्गही हिरावून घेऊ इच्छित आहे,’ अशी व्यथा त्यांनी मांडली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा